रत्नागिरी-पिंटोव्हिला 77च्या माजी विद्यार्थ्यांचा विधायक निर्णय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-पिंटोव्हिला 77च्या माजी विद्यार्थ्यांचा विधायक निर्णय
रत्नागिरी-पिंटोव्हिला 77च्या माजी विद्यार्थ्यांचा विधायक निर्णय

रत्नागिरी-पिंटोव्हिला 77च्या माजी विद्यार्थ्यांचा विधायक निर्णय

sakal_logo
By

सुखद काही ...........लोगो
...........
-rat१०p२३.jpg
34948
ः रत्नागिरी ः दादर येथील पिंटोव्हिला हायस्कूलचे माजी विद्यार्थी.
--------------
ते एकत्र आले ४० वर्षांनी अन विधायक कार्य घडत गेले

पिंटोव्हिलाच्या माजी विद्यार्थ्यांचा १०५ विद्यार्थ्यांचा ग्रुप; रत्नागिरीत होणार रिसर्च सेंटर
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० ः मुंबई-दादर येथील १९७७ च्या पिंटोव्हिला हायस्कूलच्या १०५ माजी विद्यार्थी एकत्र आले, तेही ४० वर्षांनी. रेडीज यांनी चिपळूणला आलेल्या पुरामुळे झालेली विदारक स्थिती कथन केली. त्यानंतर साठीतील हा सर्व विद्यार्थी ग्रुप सामाजिक कार्यात ओढला गेला, तो अद्यापही कार्यरत आहे. भांबेड (ता. लांजा) येथील ज्येष्ठ रंगकर्मी अमोल रेडीज यांच्याकडे हा गट जमा झाला, तेव्हा सारे एकत्र आले.
या हायस्कूलच्या विद्यार्थ्यांमध्ये कुणी डॉक्टर्स, इंजिनिअर, व्यावसायिक, पोलिस अधिकारी, रेल्वे, ओएनजिसी, नोकरवर्ग, दुकानदार असून सर्वजण साठ वर्षांच्या आसपास आहेत. स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने पहिल्यांदा काहीजण जमले. यामध्ये प्रमोद पराडकर, संजय सावंत, दीपक पवार, अरुण दळवी, रमेश रावळ, अरविंद गांगण, चंद्रशेखर दौंड, अजित रानडे, वैभव साळगावकर, तोसकर, अजय माणगांवकर, कालिप्रसाद शहा, मुकुंद चित्तल, प्रशांत मयेकर, विनाकांत वायंगणकर आदी मंडळींनी पुढाकार घेऊन इतर मित्रांना अतिशय मेहनतीने शोधून काढले. बहुतेक सर्व मित्र हे आपापल्या परिस्थितीतून बाहेर येऊन चांगलेच स्थिरस्थावर आहेत. हा ग्रुप सर्वांत मोठा आहे. तोही सुमारे ४२ ते ४३ वर्षानंतर मौजमस्ती करण्यासाठी रेडीज यांच्या भांबेड गावात आले. त्या वेळी त्यांनी चिपळूणला पुरामुळे झालेली विदारक स्थिती त्यांना कथन केली. त्या वेळी जमलेला हा ग्रुप समाजकार्याकडे ओढला गेला. त्यानंतर त्यांनी व्हॉट्सअॅपवर आवाहन केले, त्याला प्रतिसाद मिळाला आणि एक लाख रुपये गोळा झाले. साठीतील या तरुणांनी मग रोगराईची पर्वा न करता जीवनावश्यक वस्तूंचे कीट तयार करून आवश्यक घरात स्वतः जाऊन वाटले. या ग्रुपने सामाजिक वसा स्वीकाराला.
...
चौकट
१०५ जणं एकमेकांना कुटुंबाप्रमाणे जपतात
मध्यंतरीच्या कोविडमुळे काही मित्र त्यांच्या घरची मंडळी, नातेवाईक आजारी पडले असताना त्यांना हॉस्पिटलसेवा, औषधं उपलब्ध करून दिली. ज्या काळात घरची माणसं ही दूर राहात होती, तेव्हा हे मित्र मात्र एकमेकांसाठी होते. तीन-चार वर्षांत ५ मित्र सोडून गेले. त्यांच्या घरच्यांनाही या ग्रुपने आधार दिला. ज्यांना गरज होती, त्यांना सहकार्य केले. हा ग्रुप म्हणजे एकसंघ मण्यांची माळ बनला आहे. १०५ जणं एकमेकांना कुटुंबाप्रमाणे जपतात. ग्रुपमध्ये अजित रानडे हे मुंबईला हॉस्पिटलचे डीन असून रिटायर्ड झाल्यावर रत्नागिरीत एक रिसर्च सेंटर उघडण्याचा त्यांचा मनोदय आहे.
---------
चौकट
विधवा प्रथेबाबतही ठराव
दीपक पवार (बापू) हे कुटुंबप्रमुखांसारखे, संजय सावंत हा सामाजिक कार्यकर्ता. गटातील बहुतेक जण कोकणातील आहेत. शासनाने ग्रामपंचायतीना केलेल्या आवाहनानुसार, काही ग्रामपंचायतींनी विधवा प्रथा निर्मुलनाबाबतीत ठराव केले, तसाच ठराव या ग्रुपने स्नेहसंमेलनाच्या वेळी केला व नुसते आपल्या घरात नाही तर आपल्या संबंधित सर्व लोकांना प्रबोधन करून विधवा प्रथा मोडीत काढण्याचा ठराव केला. सामाजिक चळवळीत भाग घेऊन असा ठराव करणारा हा आपला ग्रुप असून या ग्रुपचा आदर्श घेऊन इतरही माजी विद्यार्थी संघटनेच्या ग्रुपने असे पाऊल उचलावे, असे मत संतोष डिचोलकर यांनी व्यक्त केले. मिलिंद तुप्ते यांनी अनुमोदन दिले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y75917 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top