इंडियन एक्स सव्र्हिसेस लिग कार्यकारीणीची निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंडियन एक्स सव्र्हिसेस
लिग कार्यकारीणीची निवड
इंडियन एक्स सव्र्हिसेस लिग कार्यकारीणीची निवड

इंडियन एक्स सव्र्हिसेस लिग कार्यकारीणीची निवड

sakal_logo
By

L34968

सावंतवाडी ः शशिकांत गावडे यांचे पुष्पगुच्छ अभिनंदन करतांना पी. एफ. डॉन्टस, शिवराम जोशी आदी.


इंडियन एक्स सव्र्हिसेस
लिग कार्यकारीणीची निवड
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १० ः माजी सैनिक संघटनेच्या इंडियन एक्स सव्र्हिसेस लिग, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी शशिकांत गावडे, कार्याध्यक्ष सुभाष सावंत, उपाध्यक्ष कृष्णा परब, भास्कर कोचरेकर, लक्ष्मण राणे, जन. सेक्रेटरी दिपक राऊळ, सहसचिव बाळकृष्ण गावडे, कोषाध्यक्ष बाबुराव कविटकर यांची एकमताने निवड करण्यात आली. ECHS पणजी-गोवाच्या क्वॉटरली अॅडव्हायझर कमिटीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून व्हिक्टर पिंटो व लक्ष्मण राणे यांची निवड करण्यात आली. इंडियन एक्स सव्हिसेस लिग व ही शासन मान्य संघटना असून देशाच्या सर्वोच्च संसदेची मान्यता या संघटनेला आहे. इंडियन एक्स सर्व्हिसेस लिग संघटनेची महाराष्ट्र राज्याचे माजी अध्यक्ष पी. एफ. डॉन्टस यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच माजी सैनिकांची सभा कोलगाव येथे झाली.

यावेळी जिल्हा कार्यकारणी व प्रत्येक तालुक्यासाठी नवीन कार्यकारणीच्या अध्यक्षांची निवड करण्यात आली. यावेळी माजी सैनिकांच्या अनेक समस्यांवर चर्चा करण्यात आली तर सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सी. एस. डी. कॅन्टींग त्वरित सुरु करण्यासाठी जी. ओ. सी. व कर्नल क्यू, सब एरिया, पुणे कार्यालयाशी संपर्क साधून पत्रव्यवहार करण्याचे ठरविण्यात आले. यावेळी नुकतेच निवृत्त झालेले सुभेदार सुभाष कदम, हवालदार सुनिल गावडे, नायक दिलीप गावडे या माजी सैनिकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला. सैनिक पतसंस्थेचे चेअरमन शिवराम जोशी, व्हाईस चेअरमन हिंदबाळ केळूस्कर, दिनानाथ सावंत, शिवाजी परब, राजाराम वळंजू, शशिकांत गावडे, दिपक शेटये, व्हिक्टर पिंटो, भिवा गावडे, चंद्रशेखर जोशी, शशिकांत मोरजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल राऊळ आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y75928 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..