साटेलीत सूर्यनमस्कार स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साटेलीत सूर्यनमस्कार स्पर्धा
साटेलीत सूर्यनमस्कार स्पर्धा

साटेलीत सूर्यनमस्कार स्पर्धा

sakal_logo
By

साटेलीत सूर्यनमस्कार स्पर्धा
दोडामार्ग ः सद्गुरू समर्थ राहुल महाराज सेवा ट्रस्ट, साटेली-भेडशी, योग संगम समिती, साटेली-भेडशी व ओम नित्य दिव्य योगाश्रम, बेतोडा-गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने सूर्यनमस्कार स्पर्धा आयोजित केली आहे. ७ ऑगस्टला साटेली-भेडशी येथील परमपूज्य सद्गुरू राऊळ महाराज स्मारक मंदिरात स्पर्धा चार गटांत ही स्पर्धा होणार आहे. यात वय वर्षे ५ ते १० एक गट, ११ ते १५ दुसरा गट, १६ ते २० वर्षे वयोगटांचा मुलांचा व मुलींचा गट असेल. प्रत्येक गटामध्ये प्रथम तीन पुरस्कार असतील. १६ ते २२ या कालावधीत या स्पर्धेसाठी ऑनलाईन चाचणी होणार असून, निवड झालेल्या मुलांची ७ ऑगस्टला प्रत्यक्ष स्पर्धा होईल. श्याम गोवेकर, मनोज नाईक यांच्याशी संपर्क साधावा.
---
देवगडात ऑगस्टमध्ये लोकअदालत
देवगड ः उच्च न्यायालय मुंबई, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण-मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण- सिंधुदुर्ग ओरोस यांनी दिलेल्या निर्देशास अनुसरून देवगड दिवाणी न्यायालय ‘क’ स्तर-देवगड येथे १३ ऑगस्टला सकाळी दहाला राष्ट्रीय लोकअदालत आयोजित केली आहे. तालुका विधी सेवा समिती-देवगड व तालुका बार असोसिएशन-देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने ही राष्ट्रीय लोकअदालत होणार आहे.
---------------
कसाल पुलाखाली खड्डे
कुडाळ ः कसाल बसस्थानक समोर पुलाखाली साचलेले पाणी व चिखल पादचाऱ्यांच्या तसेच विद्यार्थ्यांच्या अंगावर उडत आहे. या ठिकाणी पुलावरून पडणाऱ्या पाण्यामुळे खाली मोठे खड्डे पडले आहेत. सेवा रस्त्यावर व पुलाखाली पाणी साचल्याने वाहन चालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही. या ठिकाणी भले मोठे दोन खड्डे आहेत. या खड्ड्यात वारंवार अपघात होत असतात. संबंधित विभागाने याची दखल घ्यावी व पुलाखालील वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी वाहनचालक तसेच पादचाऱ्यांमधून होत आहे.
--------------
निगुडेत केसरकरांची मदत
सावंतवाडी ः निगुडे-तेलीवाडी येथे कृष्णा नाईक यांच्या घरावर झाड कोसळून छपराचे नुकसान झाल्याचे समजताच सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी ताबडतोब दोन ताडपत्रींची मदत केली. ऐन पावसात ताडपत्री स्वरुपात केलेल्या मदतीचे नाईक कुटुंबीयांनी आभार मानले. आमदार केसरकरांनी तहसीलदारांशी दूरध्वनीवरून संपर्क साधत त्वरित नुकसानीचा पंचनामा करून आर्थिक मदत देण्याची सूचना केली. ही मदत देताना संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अशोक दळवी, गजानन नाटेकर, नारायण उर्फ बबन राणे, श्री. हळदणकर उपस्थित होते.
-------------
पणदुरात शालेय साहित्य वाटप
कुडाळ ः शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूरतिठा प्रशालेमध्ये वेताळ बांबर्डे कदमवाडी येथील नाग्या महादू वसतिगृहातील १८ गरीब व अनाथ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी प्रवेश घेतला आहे. या विद्यार्थ्यांना वेताळ बांबर्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने संस्थेचे चेअरमन शशिकांत अणावकर यांच्या हस्ते नुकतेच वह्या व शालेय गणवेश वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक एम. जी. कर्पे, पर्यवेक्षक व संस्था संचालक एम. एस. पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y75929 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..