वर्देत ‘चारसूत्री’चे प्रात्यक्षिक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वर्देत ‘चारसूत्री’चे प्रात्यक्षिक
वर्देत ‘चारसूत्री’चे प्रात्यक्षिक

वर्देत ‘चारसूत्री’चे प्रात्यक्षिक

sakal_logo
By

34967
वर्दे ः चारसूत्री पद्धतीने भात लागवड प्रात्यक्षिक दाखविताना कृषिदूत.

वर्देत ‘चारसूत्री’चे प्रात्यक्षिक
सावंतवाडी ः छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय, किर्लोस-ओरोसच्या कृषिदुतांनी वर्दे गावात शेतकऱ्यांना चारसूत्री पद्धतीने भात लागवडीबाबत प्रात्यक्षिकांद्वारे मार्गदर्शन केले. छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष, ‘आनंदी व समृद्ध गाव’ योजनेचे जनक तथा माजी ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या ‘नैसर्गिक शेती’ संकल्पनेतून गिरिपुष्प (ग्लिरिसिडीया) झाडाची पाने चिखलणीपूर्वी वापरून वर्दे गावात यशस्वीरित्या चारसूत्री पद्धतीने भात लागवड प्रात्यक्षिके कृषिदूत अवधूत देवधर, अरबाज पठाण, निरंजन भोगले, आकाश कदम, ओंकार कदम, आदिनाथ कांबळे, गोविंद खानोलकर, मूड वीरांजनेयुलू नाईक आणि जांबुलडिन्ने उदय किरण यांनी श्री. प्रदीप सावंत यांच्या शेतात सादर केली. यासाठी प्राचार्या एस. पी. सामंत, कार्यक्रम समन्वयक एन. ए. साईल, प्राध्यापक डॉ. एल. एस. व्यवहारे, डॉ. पी. जे. खोसे, जी. डी. गायकी यांचे मार्गदर्शन लाभले.
...............
34969
सावंतवाडी ः शंकर कांबळी यांचे स्वागत करताना बबन साळगावकर.

कांबळेंनी घेतली साळगावकरांची भेट
सावंतवाडी ः माजी आमदार शंकर कांबळे यांनी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची त्यांच्या संपर्क कार्यालयात सदिच्छा भेट घेतली. यावेळी दोघांनीही राजकीय परिस्थितीवर चर्चा केली. या अचानक भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. माजी आमदार श्री. कांबळे हे सावंतवाडी येथे आयोजित कार्यक्रमासाठी होते. कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी श्री. साळगावकर यांच्या कार्यालयात जात त्यांची विचारपूस केली. यावेळी दोघांमध्ये बराच वेळ राजकीय चर्चा झाली. यावेळी माजी नगरसेवक उमेश कोरगावकर, सुरेश भोगटे, विलास जाधव, जावेद शेख यांच्याशी प्रदीर्घ चर्चा सुरू होती. यावेळी रवी जाधव, शिवाजी चौक मित्रमंडळाचे सचिव दीपक सावंत, उपाध्यक्ष बंड्या तोरसेकर आदी उपस्थित होते.
.................
34970
जवाहर विद्यालयासाठी पात्र ठरलेल्या कोमल राणेचे अभिनंदन करताना शिक्षक.

नवोदय परीक्षेत कोमलचे यश
मालवण ः भारत सरकारच्या नवोदय विद्यालय समिती या संस्थेमार्फत एप्रिलमध्ये घेण्यात आलेल्या जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षेत ओझर विद्यामंदिर कांदळगाव या प्रशालेची सहावीची विद्यार्थिनी कोमल राणे हिने यश मिळविले आहे. ती जवाहर नवोदय विद्यालयासाठी पात्र ठरली आहे. या यशाबद्दल तिचे ओझर विद्यामंदिरचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले. तिला कांदळगाव परबवाडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं. २ च्या शिक्षिका पल्लवी राणे तसेच तिचे वडील ओझर विद्यामंदिरचे शिक्षक पांडुरंग राणे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल कांदळगाव परिसरातून तिचे अभिनंदन होत आहे.
---------
35069
दीक्षा राऊळ, ईशा मेस्त्री

नवोदयसाठी दीक्षा, ईशाची निवड
सावंतवाडी ः जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत मळगाव इंग्लिश स्कूल मळगावच्या दोन विद्यार्थिनींची निवड झाली. यात सहावीची विद्यार्थिनी दीक्षा राऊळ (मळगाव) व ईशा मेस्त्री (तळवडे) यांचा समावेश आहे. दोन्ही विद्यार्थिनींनी पाचवीतून जवाहर नवोदय विद्यालयाची प्रवेश परीक्षा दिली होती. या दोघींनी कोणतीही शिकवणी वर्ग न घेता हे यश मिळविले. या यशाबद्दल मळगाव ऐक्यवर्धक संघ मुंबई संचालित मळगांव इंग्लिश स्कूल मळगावचे संस्थाध्यक्ष श्री. मळगावकर, सचिव आर. आर. राऊळ, खजिनदार नंदकिशोर राऊळ, कायदेविषयक सल्लागार विरेश राऊळ, शाळा समिती चेअरमन मनोहर राऊळ, मुख्याध्यापिका श्रद्धा सावंत आदींनी अभिनंदन केले.
...................
सावंतवाडीत उद्या आरोग्य शिबिर
सावंतवाडी ः रोटरी फिजिओथेअरपी सेंटर ही संस्था गरीब आणि गरजू रुग्णांसाठी माफक दरात सेवा देणारी संस्था सावंतवाडीत कार्यरत आहे. आजवर अनेक रुग्ण बरे होऊन त्यांनी दैनंदिन आयुष्याला सुरुवात केली आहे. रोटरी फिजिओथेअरपी सेंटरमध्ये कंबरदुखी, पाठदुखी, मानदुखी, गुढगेदुखी, पॅरेलेसीस रुग्ण, शस्त्रक्रियेनंतरचे व्यायाम आदींवर सुविधा उपलब्ध आहेत. रुग्णावर इलेक्ट्रिक थेरपीने उपचार केले जातात. यासाठी रोटरी फिजिओथेअरपी सेंटर, साधले मेस समोर, खासकीलवाडा येथे मंगळवारी (ता. १२) सायंकाळी चार ते आठपर्यंत मोफत शिबिराचे आयोजन केले आहे, असे आयोजकांनी कळविले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y75930 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..