रत्नागिरी-पोलिस अधीक्षकांकडून परशुराम घाटाची पाहणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-पोलिस अधीक्षकांकडून परशुराम घाटाची पाहणी
रत्नागिरी-पोलिस अधीक्षकांकडून परशुराम घाटाची पाहणी

रत्नागिरी-पोलिस अधीक्षकांकडून परशुराम घाटाची पाहणी

sakal_logo
By

- rat10p21.jpg
L34940
- खेड ः परशुराम घाटाची पाहणी करताना जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग.
----------
परशुराम घाटाची डॉ. गर्ग यांनी केली पाहणी

आपत्कालीन परिस्थितीचा आढावा; चिपळूण, खेडला बैठक
रत्नागिरी, ता. १० ः जिल्ह्यातील पर्जन्यवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांनी पशुराम घाटासह चिपळुण व खेड येथे दौरा करुन आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाणाऱ्‍या परिस्थितीची पाहणी केली. एनडीआरएफच्या जवानांशी संवाद साधला आणि स्थानिक नागरिकांना आवाहन केले.
महापुरात दरड कोसळणे, पुर वगैरे घटनांमुळे अनेक लोकांची घरे उदध्वस्त होऊन खूप हानी झाली होती. यावेळी काही ठिकाणी जीवितहानी झाली होती. त्या घटनेच्या अनुषंगाने यावर्षी खबरदारी म्हणून चिपळूण बाजारपेठ, पेठमाप, गोवळकोट, परशुराम घाट तसेच खेड पोलिस ठाण्याचे हद्दीमध्ये बाजारपेठ व मच्छीमार्केट आदी ठिकाणी भेट दिली. या भेटीत पोलिस अधीक्षकांनी तेथील नागरिकांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. खेड पालिकेच्या सभागृहात खेड पोलिस ठाणे हद्दीतील बचाव पथके, मदत करणारे नागरिक यांची बैठक घेऊन संवाद साधला. बचाव कार्याकरिता तैनात केलेल्या एनडीआरएफ टीम, नौकादल, रेड फोर्स पथक यांच्याशी संवाद साधला. या वेळी चिपळूणचे उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन बारी, उपविभागीय पोलिस अधिकारी शशीकिरण काशीद, पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे, पोलिस निरीक्षक निशा जाधव उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y75995 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top