पावस-संक्षिप्त पट्टा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावस-संक्षिप्त पट्टा
पावस-संक्षिप्त पट्टा

पावस-संक्षिप्त पट्टा

sakal_logo
By

-rat10p37.jpg
35025
- गोळप (ता. रत्नागिरी) ः गोळप-शिरबांड शाळेत आषाढी एकादशीनिमित्त लहान मुलांनी दिंडी काढली.
--------------
शिरंबाड शाळेत वारकरी दिंडी
पावस ः आषाढी एकादशीनिमित्त रत्नागिरी तालुक्यातील गोळप-शिरंबाड शाळा व अंगणवाडीतर्फे दिंडी काढण्यात आली. शाळेतील व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना विठ्ठल, रुक्मिणी व वारकऱ्याच्या वेशभूषेत टाळ मृदंगाच्या जयघोषात शाळेच्या परिसरात पायी दिंडी काढण्यात आली. या दिंडीत पालक, विद्यार्थी, सर्व शिक्षक, अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाले होते. या दिंडीसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती वृषाली सदाशिव हेळेकर , श्री. कुलकर्णी व अंगणवाडी कर्मचारी सौ. वनिता गणेश झोरे यांचे विशेष मार्गदर्शन मिळाले.
--------
ओळगावला पौष्टिक तृणधान्य दिन
दाभोळ ः तालुक्यातील ओळगाव येथे पौष्टिक तृणधान्य दिवस साजरा करण्यात आला. तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक गणेश कोरके यांनी या योजनेंतर्गत घराशेजारीच एक गुंठे प्रक्षेत्रावर अकरा प्रकारच्या भाज्यांचे कीट कृषी विभागाने तयार केले असून याचे प्रत्येक गावातील दहा शेतकऱ्‍यांना वाटप करण्यात येणार असल्याचे सांगितले. कृषी सहाय्यक दर्शना वरवडेकर यांनी शेतकऱ्‍यांना पौष्टीक तृणधान्याचे आहारातील महत्व सांगितले. यावेळी दाभोळ मंडळ कृषी अधिकारी जय मेटे आदी उपस्थित होते. आभार सूर्यकांत पाष्टे यांनी मानले.
----------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76006 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top