
राजापूर-निवासी नायब तहसीलदार पंडित यांचा सत्कार
-rat१०p३८.jpg
L३५०३४
- राजापूर ः दीपाली पंडीत यांचा सत्कार करताना माय राजापूरचे जगदीश पवार, नित्यानंद पाटील, प्रणोती भोसले, संदीप देशपांडे, संजय मांडवकर, सुधा चव्हाण आदी.
------------
निवासी नायब तहसीलदार
पंडित यांचा सत्कार
राजापूर, ता. १३ ः राजापूर प्रांत कार्यालयातील महसूल अव्वल कारकून दीपाली पंडित यांची पदोन्नतीवर येथील तहसील कार्यालयात निवासी नायब तहसीलदारपदी नियुक्ती झाल्याबद्दल माय राजापूर या सामाजिक संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
तालुक्यातील रायपाटणच्या सुकन्या असलेल्या सौ. पंडित या १९९० मध्ये महसूल सेवेत लिपीक या पदावर रूजू झाल्या. त्यानंतर २००७ मध्ये त्यांची अव्वल कारकून म्हणून पदोन्नती झाली. २०१८ पासून त्या नायब तहसीलदार म्हणून पदोन्नतीस पात्र होत्या. मात्र, शासनाकडूनच या पदोन्नत्या रखडल्या होत्या. अखेर शासनाने या पदोन्नत्या जाहीर केल्या आहे. त्यामध्ये येथील प्रांताधिकारी कार्यालयात अव्वल कारकून म्हणून कार्यरत असलेल्या सौ. पंडित यांची राजापूर तहसिलदार कार्यालयातील रिक्त असलेल्या निवासी नायब तहसीलदारपदी पदोन्नतीवर बदली झाली आहे. निवासी नायब तहसिलदार म्हणून झालेल्या नियुक्तीबद्दल त्यांचे माय राजापूरचे प्रमुख जगदीश पवार, नित्यानंद पाटील, प्रणोती भोसले, संदीप देशपांडे, संजय मांडवकर, सुधा चव्हाण आदींनी सत्कार करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76018 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..