राजापूर-नांगरणी करताना वीजवाहिनी पडलेल्याने शेतकरी जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर-नांगरणी करताना वीजवाहिनी पडलेल्याने शेतकरी जखमी
राजापूर-नांगरणी करताना वीजवाहिनी पडलेल्याने शेतकरी जखमी

राजापूर-नांगरणी करताना वीजवाहिनी पडलेल्याने शेतकरी जखमी

sakal_logo
By

-rat10p43.jpg
35061
- राजापूर ः आंब्याचे झाड वीज वाहिनीवर कोसळलेल्या ठिकाणी पाहणी करताना पोलिस.
--------
वीजेच्या तारांचा स्पर्श; शेतकरी जखमी

पुतण्याने वाचवला जीव; आणखी सहाजणांना लागला शॉक
राजापूर, ता. १० ः शेतात नांगरणीचे काम करत असताना वादळी वाऱ्यामुळे आंब्याच्या झाडासह वीजवाहिनी कोसळून चुनाकोळवण सुतारवाडी येथील अनाजी मिरजोळकर हे जखमी झाले. पुतण्याने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे अनाजी मिरजोळकर हे बालंबाल बचावले आहेत.
मिरजोळकर हे शनिवारी (ता. ९) आपल्या घराजवळील शेतामध्ये नांगरणीचे काम करत होते. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे त्यांच्या शेताजवळून जाणाऱ्या वीज वाहिनीवर झाड पडून तारा शेतात पडल्याने त्यांना शॉक लागला. पडलेल्या तारांमध्ये विद्युतप्रवाह चालू होता. परंतु त्यांच्या पुतण्याने प्रसंगावधान राखून त्याच्या हातातील कोयते तारांवर फेकून मारल्याने त्या तारा तुटल्या व सुक्या बांबूने त्या बाजूला केल्याने मोठा अनर्थ टळला.
आंब्याचे झाड त्यांच्या खांद्यावर पडल्याने ते जखमी होऊन शेतात लोळू लागले आणि बेशुद्ध झाले. त्यांच्या खांद्याला मार लागला आहे. तत्काळ त्यांना ओणी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार करून रात्री उशिरा त्यांना घरी सोडले. त्यांची प्रकृती सुधारत आहे.
..
चौकट
राजापूर पोलिसांची घटनास्थळी भेट
दरम्यान, मिरजोळकर यांच्याबरोबर शेतात काम करत असलेल्या तीन महिला व तीन पुरुष यांनाही शॉक लागला. या घटनेनंतर राजापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला.
--------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76035 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..