
डी. फार्मसी प्रवेशासाठी शुक्रवारपर्यंत मुदतवाढ
डी. फार्मसी प्रवेशासाठी
शुक्रवारपर्यंत मुदतवाढ
सावंतवाडी, ता. १० ः तंत्रशिक्षण संचालनालयाने डी. फार्मसी प्रथम वर्ष प्रवेशासाठी अर्ज करण्याची मुदत वाढविली असून विद्यार्थ्यांना शुक्रवार (ता.१५) पर्यंत अर्ज करता येईल. आवश्यक ती कागदपत्रे व दाखले मिळण्यात अडचणी येत असल्याने प्रवेश अर्ज सादर करण्यासाठी ही मुदतवाढ दिली आहे. यानंतर रविवारी (ता.१७) तात्पुरती, तर बुधवारी (ता२०) पक्की गुणवत्ता यादी जाहीर होईल. त्यानंतरच संस्था निवडण्यासाठीच्या पसंतीक्रम फेरीला (कॅप राउंड) सुरुवात होईल.
सध्या सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे तहसील कार्यालयांतून मिळणारे विविध प्रकारचे दाखले अद्यापही विद्यार्थ्यांना उपलब्ध झालेले नाहीत. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना वेळेत अर्ज भरता आलेले नाहीत. बारावीची मूळ गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखलाही गेल्या आठवड्यात विद्यार्थ्यांच्या ताब्यात मिळाले. ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. डी.फार्मसीसाठी बारावीच्या गुणांवरच प्रवेश दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांना १५ जुलैपर्यंत http://dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्ज सादर करावयाचे आहेत. सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजमध्ये शासकीय प्रवेश सुविधा केंद्र सुरू असून, विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरणे, कागदपत्रांची पडताळणीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. विजय जगताप व प्राचार्य सत्यजित साठे यांनी केले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76056 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..