चिपळूण-कल्याण टोलवेज कंपनीसह 9 जणांवर वर्षभराने गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण-कल्याण टोलवेज कंपनीसह 9 जणांवर वर्षभराने गुन्हा दाखल
चिपळूण-कल्याण टोलवेज कंपनीसह 9 जणांवर वर्षभराने गुन्हा दाखल

चिपळूण-कल्याण टोलवेज कंपनीसह 9 जणांवर वर्षभराने गुन्हा दाखल

sakal_logo
By

पेढेतील दुर्घटना; लोगो
......
कल्याण टोलवेजसह ९ जणांवर गुन्हा

अॅड. पेचकर यांची माहिती; सदोष मनुष्यवधाचा ठपका, दरड कोसळून तिघांचा झाला होता मृत्यू
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १० : तालुक्यातील पेढे-कुंभारवाडी येथे गतवर्षी २२ जुलैला झालेल्या अतिवृष्टीत दरड कोसळून तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली होती. याप्रकरणी महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या कल्याण टोलवेज इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या संचालकांसह राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी अशा एकूण नऊ जणांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा रविवारी येथील पोलिस ठाण्यात दाखल केला. कोकणात प्रथमच अशा पद्धतीचा गुन्हा नोंद झाला.
मुंबई उच्च न्यायालयाचे अॅड. ओवेस पेचकर यांनी चार दिवसांपूर्वी एका अर्जाद्वारे येथील न्यायदंडाधिकाऱ्यांकडे गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.
महामार्गावरील परशुराम घाटाच्या पायथ्याशी पेढे गाव वसले आहे. परशुराम घाटात चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने जागोजागी डोंगर कटाई सुरू आहे. गतवर्षी या कामाला सुरवात करताना रस्त्यालगत भराव केला होता. घाटातील नैसर्गिक नाले व अन्य मार्ग मातीने बुजून गेल्याने पावसाचे पाणी वाहून अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे पेढे कुंभारवाडी येथील नाल्यातून मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी आले. त्यासोबत मोठ मोठे दगडही वाहून आल्याने पायथ्यालगत असलेल्या सहा घरांना त्याचा फटका बसला. यातील तीन घरांवर दरड कोसळल्याने तिघांचा मृत्यू झाला. यामध्ये आरूषी अविनाश मांडवकर (दीड वर्ष), सावित्री उर्फ अर्चना मांडवकर (५५) व आरोही अविनाश मांडवकर (२५ सर्व रा. पेढे कुंभारवाडी) यांचा दरडीखाली सापडून गुदमरून मृत्यू झाला होता. तसेच सुप्रिया शशिकांत मांडवकर ही गंभीरपणे जखमी जखमी झाली होती.
विविध न्याय मागण्यांची पूर्तता केली गेली नसल्याने अखेर संबंधित कुटुंबाच्या वतीने न्यायदंडाधिकाऱ्यांकडे अर्ज सादर केला होता. त्यानुसार न्यायालयाने उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. याप्रकरणी पुढील सुनावणी १६ जुलै रोजी होणार आहे.
-------------
चौकट
ठेकेदार कंपनीचा कानाडोळा..
दरम्यान, या घटनेवर ग्रामस्थांनी जोरदार आक्षेप घेत संबंधित ठेकेदार कंपनी व राष्ट्रीय महामार्गचे अधिकारी जबाबदार असल्याने त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली होती. वारंवार दाद मागूनही ठेकेदार कंपनी व राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून दखल घेतली नाही. अखेर पोलिस व प्रशासनाला निवेदन दिले व उपोषणे देखील केली. त्याची दखल घेत, प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी ३० नोव्हेंबर २०२१ रोजी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना या प्रकरणी फेरचौकशीचे आदेश दिले होते. परंतू, त्याचा अहवाल दिलेला नाही. तसेच संबंधित कुटुंबाला मोबदलाही दिलेला नाही.
..
एक नजर..
मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची होती मागणी
प्रांताचे फेरचौकशीचे आदेश; अहवाल अद्याप दिला नाही
उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना अहवाल देण्याचे निर्देश
न्यायालयाची पुढील सुनावणी १६ जुलै रोजी होणार
..
चौकट
..या ९ जणांचा समावेश
कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे तत्कालिन अधिकारी, संचालक राजेश गर्ग, अमित गर्ग, टिकमचंद गर्ग, अंकित चौरासीया, विवेक गोयल, ज्योती सोहनी, तसेच राष्ट्रीय महामार्गचे उपविभागीय अभियंता श्रीकांत बांगर, अमोल माडकर यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला, अॅड. पेचकर यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76064 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top