रत्नागिरी-रत्नागिरीतील शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या पाठीशी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-रत्नागिरीतील शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या पाठीशी
रत्नागिरी-रत्नागिरीतील शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या पाठीशी

रत्नागिरी-रत्नागिरीतील शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या पाठीशी

sakal_logo
By

जागा कमी असल्यास खालील एक फोटो घेवू नये
...
- rat10p46.jpg
35100
- रत्नागिरी ः रत्नागिरी ः मेळाव्याला उपस्थित शिवसैनिक
...
- rat10p47.jpg
35101
- रत्नागिरी ः रत्नागिरीत ः मेळाव्यात मार्गदर्शन करताना आमदार राजन साळवी. (राजेश कळंबटे ः सकाळ छायाचित्रसेवा)
---------
जिल्ह्यातील शिवसैनिक ठाकरेंच्या पाठीशी

रत्नागिरीतील मेळाव्यात निर्धार; हातखंबा, वाटद विभागप्रमुख अनुपस्थित
रत्नागिरी, ता. १० ः शिवसेनेत फूट पाडण्यासाठी जे प्रयत्न करतात, त्यांना उत्तर देण्यासाठी हा निर्धार मेळावा आहे. कुणी कुठेही गेले तरी चालतील, परंतु आम्ही सर्व शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असा निर्धार करत रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात विभागप्रमुखांपासून ते जिल्हाप्रमुखांपर्यंत सर्वंच नेत्यांनी करत आगामी निवडणुकीत भगवा फडकवण्यासाठी सज्ज रहा, असे आवाहन केले.
शहरातील स्वामी समर्थ मंगल कार्यालयात आयोजित मेळाव्याला शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत, उपनेते आमदार राजन साळवी, जिल्हाप्रमुख विलास चाळके, तालुकाप्रमुख बंड्या साळवी, प्रमोद शेरे, शहरप्रमुख बिपिन बंदकर, प्रसाद सावंत, युवासेना तालुका युवाधिकारी वैभव पाटील यांच्यासह उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुखांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. भगव्या टोप्या, भगवं उपरणं अशा पेहराव्यात उपस्थित शिवसैनिकांनी घोषणांचा पाऊस पाडत वातावरण उत्साही बनवले होते. अनेक जुने शिवसैनिक-नवे शिवसैनिक याठिकाणी उपस्थित होते. हातखंबा आणि वाटदचे विभागप्रमुखांनी या मेळाव्याकडे मात्र पाठ फिरवली.
याप्रसंगी महेंद्र झापडेकर यांनी, हरचेरी गट शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, तो उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम करत राहील, असा विश्‍वास दिला. प्रकाश रसाळांनी शिवसेनेत फूट पाडणाऱ्‍यांना उत्तर देण्यासाठीचा हा मेळावा असल्याचे सांगितले. गोळपचे नंदा मुरकरांनी सामान्य शिवसैनिक सेनेसोबतच राहील, असे सांगत आम्ही उद्धव ठाकरेंच्या पाठीशी कायम राहू, असे जाहीर केले. आम्ही काल, आज आणि उद्या शिवसैनिकच राहू, असे सांगत आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक असल्याचे उपतालुकाप्रमुख शेखर घोसाळांनी जाहीर केले. विभागप्रमुख अभय खेडेकर, विजय देसाई, किरण तोडणकर, सुभाष पावसकर, उत्तम मोरे यांनीही विश्‍वासदर्शक भाषणं केली. तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांनी येणाऱ्‍या निवडणुकीत शंभर टक्के भगवा फडकवू, असा विश्‍वास दिला. उदय बने म्हणाले, अनेक वादळ आली, सैनिक जैसे थेच आहे. आज ती वेळ आली आहे. तयार रहा, रात्रीचा दिवस करायला. ज्यांना मिळाले ते सगळे गेले, ज्यांना नाही मिळाले, ते राहिलेत. आता प्रत्येक वाडीत जाऊन प्रत्येक घरांवर भगवा पोचवायचा आहे.
----
चौकट
मंगेश साळवींची खंत
मागील सात आठ वर्षात शिवसैनिकाला मनोगत व्यक्त करण्याची संधीच मिळाली नाही, अशी खंत गोळपचे मंगेश साळवी यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, जुन्या शिवसैनिकांना कोणतीही किंमत नव्हती. माझे आयत्यावेळी तिकीट कापण्यात येत होते; परंतु आमदार साळवी मला तिकीट दिले. आम्हाला डावलून बाबू म्हाप यांना सभापती केले. पण आम्ही शिवसैनिक म्हणून शांत राहिलो. आजही भगवा फडकवण्यासाठी सज्ज आहोत.
..
चौकट
माझ्याकडे माकडं पण आहेत..
माझ्याकडे या डोंगर आहेत, झाडी आहे आणि जोडीला माकडं पण आहेत, असे उदय बनेंनी बोलताच कोपऱ्‍यातील शिवसैनिकांकडून ती सगळी गेली, अशी टिप्पणी करत प्रतिसाद दिला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76086 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top