बांद्यात बाल वारकरी दिंडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बांद्यात बाल वारकरी दिंडी
बांद्यात बाल वारकरी दिंडी

बांद्यात बाल वारकरी दिंडी

sakal_logo
By

३५०६४
बांदा ः वारकरी दिंडीत सहभागी बांदा केंद्रशाळेचे विद्यार्थी.

बांद्यात बाल वारकरी दिंडी
बांदा ः आषाढी एकादशीचे औचित्य साधून उपक्रमशील‌ शाळा म्हणून ख्याती असलेल्या येथील जिल्हा ‌परिषद शाळा नं. १ च्या विद्यार्थ्यांनी आज शाळेपासून विठ्ठल मंदिरापर्यंत वारकरी दिंडी काढली. विशेष म्हणजे रविवारची सुटी असूनही विद्यार्थ्यांचा उत्साह उल्लेखनीय होता. विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणी, संत, वारकरी यांच्या वेशभूषा परिधान करून शहरातील कट्टा कॉर्नर, गांधी चौक, बांदा बाजारपेठेतून टाळ, लेझीम, ढोलाच्या जयघोषात दिंडी काढण्यात आली. यात नैतिक मोरजकरने विठ्ठलाची, तर शुभ्रा तेली हिने साकारलेली रुक्मिणीची वेशभूषा लक्षवेधी ठरली. लौकीक तळवडेकर याच्या अभंग गायनाने वातावरण भक्तिमय बनले. चिमुकल्यांच्या दिंडीचे विठ्ठल मंदिर देवस्थान कमिटीच्यावतीने स्वागत झाले. शाळा समिती अध्यक्ष नीलेश मोरजकर, शिक्षिका सरोज नाईक, उर्मिला मोर्ये, रंगनाथ परब, जे. डी. पाटील, प्रशांत पवार, गोपाळ साबळे आदींनी परिश्रम घेतले.
----
३४९१५
भिरवंडे ः वृक्ष वाटप कार्यक्रमावेळी ग्रामस्थ.

भिरवंडेत कृषीदुतांतर्फे वृक्षारोपण
कनेडी ः छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय किर्लोस महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कृषी दिन साजरा केला. भिरवंडे ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद शाळा भिरवंडे येथे वृक्ष लागवड केली. तसेच ग्रामस्थांना वृक्ष वाटप केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते संदीप सावंत, पोस्टमन नंदु सावंत, कृषीसेवक अर्चना केंद्रे तसेच विद्यार्थी रणजित घाडगे, जिवन मदने, मयुरेश जाधव, सौरभ कोकरे, अनिकेत गलांडे आदींच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. तसेच गावातील शेतकऱ्यांना कृषी विषयक माहिती देण्यात आली.
--------
कणकवलीत वह्यांचे वाटप
कणकवली ः लक्ष्मीबाई गोपाळ सामंत विद्यालय व अशोक मधुकर पावसकर कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने वह्या वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संदेश सावंत यांनी विद्यार्थ्यांना वह्या वाटप करत पुढील काळात शाळेच्या शैक्षणिक समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. यावेळी माजी उपसभापती बुलंद पटेल, प्रशालेचे माजी शिक्षक व माजी पंचायत समिती सभापती बाबा वर्देकर यांनी शैक्षणिक साहित्य वाटप हा उपक्रम अतिशय स्तुत्य असल्याचे सांगितले, चेअरमन ओमप्रकाश ताम्हाणेकर तसेच दिनकर पेडणेकर यांनीही विचार मांडले. प्रभारी मुख्याध्यापक नेवाळकर यांनी प्रास्ताविक केले.
-----------------
वेंगुर्लेत विविध धार्मिक विधी
वेंगुर्ले ः वेंगुर्ले ब्राह्मण मंडळाच्या कुबलवाडा दत्त मंदिरात झालेल्या सभेत विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले. यामध्ये बुधवारी (ता.१३) व्यासपौर्णिमेनिमित्त सायंकाळी चारला कुबलवाडा दत्त मंदिरात व्यासपूजन, २३ ला श्री रामेश्वर मंदिरात प्रतिवार्षिक महारुद्र आणि २४ ला तालुका ब्राह्मण मंडळाचा वर्धापनदिन व गुणगौरव समारंभ कुबलवाडा दत्त मंदिरात दुपारी तीन ते पाच दरम्यान होणार आहे. यात तालुक्यातील दहावी व बारावीतील गुणवत्ताप्राप्त, पदवी परीक्षा, बीएएमएस व बीएचएमएसमधील प्रथम क्रमांकप्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव करणार आहेत. संबंधित विद्यार्थ्यांनी गुणपत्रिका प्रत किरात कार्यालय, वेंगुर्ले येथे २० जुलैपर्यंत आणून द्यावीत, असे आवाहन श्रीकांत रानडे व नित्यानंद आठलेकर यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76121 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top