कणकवली पंचायत समिती आरक्षण सोडत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवली पंचायत समिती आरक्षण सोडत
कणकवली पंचायत समिती आरक्षण सोडत

कणकवली पंचायत समिती आरक्षण सोडत

sakal_logo
By

पंचायत समिती
आरक्षण सोडत
कणकवली ः येथील पंचायत समितीच्या अठरा जागांसाठी आरक्षण सोडत उद्या (ता.१३ ) होणार आहे. तहसीलदार आर.जे.पावर यांच्या दालनात सकाळी अकराला ही सोडत काढली जाणार आहे. यामध्ये अनुसुतिच जाती जमातीसाठी यापुर्वीचे गण वगळुन उतरत्या क्रमांने लोकसंख्येचा विचार करून त्या प्रवर्गासाठी आरक्षण निच्छित केले जाईल. त्यानंतर पन्नास टक्के महिला आरक्षण निच्छित केले जाणार आहे. या आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
--
सावंत भोसलेंचा
१९ला मेळावा
कणकवली ः सावंत भोसले श्री कुलस्वामिनी प्रतिष्ठान मुंबई संस्थेतर्फे जिल्ह्यातील सावंत भोसले समाजातील नागरिकांचा मेळावा आयोजित केला आहे. कणकवली येथे १९ जुलैला सकाळी अकराला शहरातील मराठा मंडळाच्या सभागृहात हा मेळावा होईल. कणकवली, देवगड, वैभववाडी, मालवण तालुक्यातील समाजातील लोकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे. दरम्यान, कुलस्वामिनी भक्तनिवास बांधकाम सुरू केले असून यासाठी पाठिंबा मिळत असल्याचेही सांगण्यात आले.
---
सावंतवाडीत आज
गुरुपौर्णिमा उत्सव
सावंतवाडी ः सनातन संस्थेच्यावतीने सावंतवाडी येथे उद्या (ता.१३) गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला जाणार आहे. शहरातील वैश्य भवन येथे दुपारी तीनला या उत्सवाला प्रारंभ होईल. प्रारंभी श्री व्यासपूजा, प. पू. भक्तराज महाराजांची प्रतिमा पूजन, ‘समाज, राष्ट्र आणि धर्म’ विषयी विचार मांडले जाणार आहेत. त्यानंतर ‘धर्मनिष्ठ समाजाची निर्मिती’ आणि ‘धर्माधिष्ठीत हिंदूराष्ट्रच्या स्थापनेची आवश्यकता’ विषयावर व्याख्यान होईल.
-------
हळदीचे नेरुरला
शेतीचे प्रक्षिक्षण
कुडाळ ः ‘एक दिवस बळीराजासाठी’ उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा हळदीचे नेरुर व कृषी विभागातर्फे हळदीचे नेरुर येथे यंत्राच्या सहाय्याने भात लागवड प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. गोठोस येथील प्रगतशील शेतकरी विष्णू तामाणेकर यांनी यंत्राद्वारे भात लावणीचे प्रात्यक्षिक शेतकरी व विद्यार्थ्यांना दाखविले. मुलांनी यंत्रावर बसून भात लावणीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. मोहन शिवराम सावंत यांच्या शेतात हे धडे दिले.
--
वेंगुर्लेत
आज उत्सव
वेंगुर्ले ः वेंगुर्ले कॅम्प ख्यालगिरी येथील स्वामी समर्थ महाराजांच्या आत्मपादुका मंदिरात उद्या (ता.१३) गुरुपौर्णिमा उत्सव होणार आहे. या कार्यक्रमात स्वामींच्या पादुकांचे दर्शनास येणाऱ्या सर्व भाविकांसाठी वेंगुर्ले बाजारपेठ मित्रमंडळातर्फे महाप्रसाद देण्यात येणार आहे.
---------------------
कणकवलीत
आज उत्सव
कणकवली ः परमहंस भालचंद्र महाराज संस्थानात उद्या (ता.१३) गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76151 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..