
टुडे पान दोन मेन-वालावलच्या विकासासाठी लवकरच निधी
L35185
ओळ - वालावल ः येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना निलेश राणे. सोबत रणजित देसाई, दादा साईल आदी.
वालावलच्या विकासासाठी लवकरच निधी
निलेश राणे ः गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ११ ः वालावल गावच्या विकासासाठी लागणारा निधी टप्याटप्याने उपलब्ध करून दिला जाईल. जिओ टॉवरसहित सर्व विकास कामांची हमी मी घेतली आहे, असे प्रतिपादन माजी खासदार व भाजप नेते निलेश राणे यांनी केले.
वालावल-कवठी येथे भाजपा नेते राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत सशक्त बूथ अभियान बैठक झाली. यावेळी विविध विकासकामांवर चर्चा तसेच वालावल येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही श्री. राणे यांच्या हस्ते पार पडला. आषाढी एकादशीच्या निमित्ताने त्यांनी लक्ष्मीनारायण मंदिर वालावल येथे देव लक्ष्मी नारायणाचे दर्शन घेतले. त्यानंतर वालावल बूथ कमिटीच्यावतीने आयोजित बैठकीला ते उपस्थित होते. या बैठकीत वालावल गावातील प्रलंबित विकास कामासंदर्भात माजी सरपंच राजा प्रभू यांनी श्री. राणे यांना निवेदन दिले. गेल्या वीस वर्षात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून विविध विकासकामे वालावल गावात झाली. वालावल गावाने सातत्याने राणे यांना मताधिक्य दिले आहे. गावाच्या सर्वांगिण विकासासाठी सहकार्य करण्याची मागणी यावेळी श्री. प्रभु यांनी केली. यावेळी श्री. राणे यांनी गावाच्या विकासासाठी लागणारा निधी टप्याटप्याने उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देत जिओ टॉवरसहित सर्व विकासकामांची हमी घेतली. तसेच वालावल हायस्कूलमधील दहावीमधून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार देखील झाला. वालावलनंतर ग्रामपंचायत कार्यालय कवठी येथेही भाजपा बूथ कमिटीची बैठक पार पडली. यावेळी कवठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कवठी गावातील वीज समस्येबाबत ग्रामस्थांनी श्री. राणे यांचे लक्ष वेधले. जिओ टॉवर संबंधितांशीही यावेळी चर्चा झाली. वीज समस्येबाबत वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना गावात आणुन विज समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक सावंत, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई, महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, ओबीसी जिल्हाध्यक्ष दीपक नारकर, कुडाळ मंडल अध्यक्ष विनायक राणे, ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, आनंद शिरवलकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष रुपेश कानडे, देवेंद्र नाईक, राजा धुरी, देवेंद्र सामंत, आरती पाटील, पप्या तवटे, अभी गावडे, विनोद सावंत, मनोरंजन सावंत, जयेश चिंचळकर आदी उपस्थित होते.
...............
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76176 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..