
‘परफेक्ट’च्या विद्यार्थ्यांची नेरूर विज्ञान केंद्रास भेट
35178
नेरूर ः वसुंधरा विज्ञान केंद्राला भेट दिल्यानंतर परफेक्ट अॅकॅडमीचे विद्यार्थी.
‘परफेक्ट’च्या विद्यार्थ्यांची
नेरूर विज्ञान केंद्रास भेट
कुडाळ ः जेईई आणि नीट या परीक्षांसाठी संपूर्ण कोकण आणि गोवा येथे अव्वल मानली जाणाऱ्या परफेक्ट अॅकॅडमी, कुडाळच्या विद्यार्थ्यांनी नेरूर येथील वसुंधरा विज्ञान केंद्राला भेट दिली. जेईई, नीट या परीक्षांमध्ये देशभरातून विद्यार्थी बसत असल्यामुळे या परीक्षेमधील कडव्या स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना अकरावी, बारावी ही दोन वर्षे प्रचंड मेहनत घ्यावी लागते; पण या परीक्षांची तयारी करत असताना विज्ञानातील ज्या गोष्टी आपण शिकतो त्या गोष्टींचे देखावे, त्यांची माहिती, विज्ञान समजावून सांगणारे काही प्रयोग विद्यार्थ्यांना स्वतः पाहता यावेत आणि त्यातून त्यांना विज्ञान, तंत्रज्ञानाची सांगड पुढे जाऊन घालता यावी, हा या मागचा उद्देश होता, असे अॅकॅडमीचे प्रा. राजाराम परब यांनी सांगितले.
............
35179
कुडाळ ः तेंडोली-आवेरा प्राथमिक शाळेला ताडपत्री देताना शिवसेना पदाधिकारी.
तेंडोली-आवेरा शाळेस ताडपत्री
कुडाळ ः तेंडोली-आवेरा (ता.कुडाळ) प्राथमिक शाळेचा स्लॅब नादुरुस्त झाल्याने ग्रामस्थांच्या मागणीनुसार शिवसेनेचे अतुल बंगे यांनी विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी ताडपत्री देऊन तूर्त उपाययोजना केली. या शाळेसाठी माजी जिल्हा परिषद सदस्या श्रीमती वर्षा कुडाळकर, माजी पंचायत समिती सदस्या अनघा तेंडुलकर, शिवसेना विभाग प्रमुख संदेश प्रभू आणि शिवसेना पदाधिकारी यांच्या मागणीनुसार या शाळेसाठी निधी द्यावा, अशी मागणी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्याकडे केली होती. त्यानुसार दहा लाख रुपये नियोजनमधून देण्याचे आमदार नाईक यांनी मान्य केले आहे. शिवसेना उपजिल्हा प्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ शहरप्रमुख संतोष शिरसाट यांच्या हस्ते ताडपत्री शिवसेना पदाधिकारी श्री. धुरी यांच्या कडे सुपुर्द केली. यावेळी कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, कुडाळ तालुका संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष अतुल बंगे, युवासेना शहर पदाधिकारी अमित राणे, गुरू गडकर उपस्थित होते.
................
35180
माड्याचीवाडी ः जिव्हाळा सेवाश्रमात रंगलेला कीर्तन कार्यक्रम.
रायवाडी सेवाश्रमात रंगले कीर्तन
कुडाळ ः माड्याचीवाडी-रायवाडी येथील जिव्हाळा सेवाश्रमात आषाढी एकादशीनिमित्त कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कीर्तनकार ह.भ.प. भाऊ नाईक यांना हार्मोनियम वादक मयुर पिंगुळकर, तबला वादक गौरव पिंगुळकर यांनी साथ दिली. कीर्तनाने सेवाश्रमातील वृद्ध मंत्रमुग्ध झाले. हरी नामाचा जप करण्यात आला. लहान मुलांनी भक्तिगीते सादर करून वातावरण भक्तिमय केले. यावेळी ''जिव्हाळा''चे संस्थापक दादा बिर्जे, शोभा बिर्जे, राजू बिर्जे, साक्षी बिर्जे, श्रेया बिर्जे, विष्णू खोबरेकर, श्री. गावडे, संजय बिर्जे, आर्या बिर्जे, संदीप बिर्जे आदींसह वृद्ध व मुले उपस्थित होती.
...............
35181
श्री गावडेकाका महाराज
माड्याचीवाडीत उद्या गुरुपौर्णिमा
कुडाळ ः श्री स्वामी समर्थ मठ, माड्याचीवाडी येथे बुधवारी (ता. १३) गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. पहाटे पाचला संकल्प, सकाळी सातला अनुग्रह, साडेनऊला सत्यनारायण महापूजा, अकराला गुरुपाद्यपुजा, साडेअकराला गुरुसंदेश, दुपारी बाराला सद्गुरू दर्शन सोहळा, एकपासून अखंड महाप्रसाद, सायंकाळी सातला आरती, रात्री आठला भजन असे कार्यक्रम होणार आहेत. श्री श्री १०८ महंत प. पू. सद्गुरू श्री गावडेकाका महाराज यांचा गुरुसंदेश ऐकण्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन श्री सद्गुरू भक्त सेवा न्यास, माड्याचीवाडीचे अध्यक्ष एकनाथ गावडे यांनी केले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76177 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..