संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

-rat११p२०.jpg
३५१६८
ः चिपळूण ः मुलींना सायकल वितरणप्रसंगी रोटरीचे पदाधिकारी.
------------
रोटरीतर्फे गरजू मुलींना सायकल
चिपळूण ः शहरासह तालुक्यातील अनेक सामान्य कुटुंबातील मुलींना वाहतुकीची सुविधा नसल्याने शाळेत पायी चालत जावे लागते. त्यांची ही पायपीट थांबण्यासाठी चिपळूण रोटरी क्लबने पुढाकार घेतला. शहरासह तालुक्यातील गरजू कुटुंबातील मुलींचा शोध घेत त्यांना शाळेत जाण्यासाठी सायकल मोफत दिल्या आहेत. ६ वी व १० वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींना या सायकली देण्यात आल्या आहेत. रोटरीचे अध्यक्ष प्रसाद सागवेकर यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. रोटरी सदस्यांनी त्यांना गरजू मुलींचा शोध घेण्यासाठी सहकार्य केले. एका छोटेखानी कार्यक्रमात मुलींना सायकल वितरण करण्यात आले. या वेळी रोटरीचे अध्यक्ष प्रसाद सागवेकर, अविनाश पालशेतकर, रमण डांगे, बाळा आंबुर्ले, रोहन देवकर, दिनकर पवार, राजेश ओतारी, गणेश ओतारी, पराग बांद्रे, विनोद घुमरे, सुनील वाडेकर, समीर मेमन, प्रशांत सागवेकर, वैभव रेडीज, शैलेंद्र सावंत, आसिफ पठाण उपस्थित होते.
-----------
सुनंदा पाटीलांचा सत्कार
चिपळूण ः शहरातील पेठमाप मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका सुनंदा पाटील या ३८ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर पेठमाप मराठी शाळेतून निवृत्त झाल्या. त्या निमित्ताने खेंड केंद्राच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. केंद्राच्यावतीने चिपळूणचे गटशिक्षणाधिकारी दादासाहेब इरनाक व देसाई यांच्या हस्ते पाटील उभयतांचा सत्कार करण्यात आला. केंद्रातील शिक्षक पाध्ये, जाधव, गावडे, समीक्षा मोरे, राजे, कांबळे, भुरण, मोरे यांनी पाटील यांच्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. पाटील यांनी आपल्या मनोगतातून सेवेतील अनुभव सांगितले व जुन्या आठवणीना उजाळा दिला.
------------
-rat११p२४.jpg
L35172
ः चिपळूण ः आरती निराधार फाउंडेशनसाठी श्री. व सौ. नारकर यांच्याकडे ४८ किलो साखर सुपूर्द करताना शिंदे परिवार.
-----------
शिंदे परिवारातर्फे आरती
निराधार फाउंडेशनला मदत
चिपळूण ः इंडियन प्रेस क्लबचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राजेंद्रकुमार शिंदे तसेच राष्ट्रीय जनसेवा पक्षाचे शहराध्यक्ष विजयशेठ शिंदे यांच्या मातोश्री श्रीमती मालती महादेव शिंदे यांच्या ८५ वर्षपूर्तीनिमित्त तुला करण्यात आलेली ४८ किलो साखर पेढे परशुराम येथील आरती निराधार सेवा फाउंडेशनमध्ये देण्यात आली. या वेळी संस्थेने मालती शिंदे यांचा तसेच संस्थाचालक नारकर यांची मुलगी आरती हिचाही वाढदिवस असल्याने दोघींचाही केक कापून वाढदिवस साजरा केला. वृद्धांना आणि गतिमंद मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. या वेळी एकनाथ यादव, प्रकाश घोसाळकर, विजय बागकर, जीवन ओतारी, ऋतुजा शिंदे, सविता ओतारी, सायली ओतारी तसेच सामाजिक कार्यकर्ते संदीप कदम, इस्माईल हुजरे, ओमकार जानवलकर आदी उपस्थित होते.
-------------
-rat११p२६.jpg
35174
ः चिपळूण ः आषाढी एकादशीनिमित्ताने भाविकांना खिचडी वाटप करताना मनसे तालुका उपाध्यक्ष सुनील हळदणकर व सहकारी.
---------------
मनसेतर्फे रामपूर विभागात खिचडी वाटप
चिपळूण ः महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना रामपूर विभाग यांच्यावतीने आषाढी एकादशीनिमित्त खिचडी वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून हा उपक्रम राबवण्यात आला. या वेळी मनसे चिपळूण तालुका उपाध्यक्ष सुनील हळदणकर, अनामिका हळदणकर, अस्मिता पेढांबकर, आदित्य आवटे, रमेश वेलोंडे, रमेश पेढांमकर, अमोल चव्हाण, सुशांत पेढांमकर, प्रणिकेत बारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
----------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76260 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top