अमित ठाकरेंचे दापोलीत स्वागत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अमित ठाकरेंचे दापोलीत स्वागत
अमित ठाकरेंचे दापोलीत स्वागत

अमित ठाकरेंचे दापोलीत स्वागत

sakal_logo
By

अमित ठाकरेंचे दापोलीत स्वागत
दाभोळ, ता. ११ ः महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या दापोली दौऱ्यात त्यांचे दापोली, खेड, मंडणगड येथील मनविसे कार्यकर्त्यांनी स्वागत केले.
अमित ठाकरे यांच्या दौर्‍यानिमित्ताने दापोलीतील मुख्य दापोली-हर्णै मार्गावर मनसेचे झेंडे लावले होते. त्यामुळे शहर मनसेमय झाल्याचे वातावरण तयार झाले होते. अमित ठाकरे यांचे दापोलीत आगमन होताच ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. कार्यकर्त्यांनी या वेळी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्‍वारूढ पुतळ्याला अभिवादन करून पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दापोली दौर्‍याची सुरवात केली. कार्यकर्त्यांनी केळसकरनाका ते राधाकृष्ण मंदिर अशी रिक्षा, मोटारसायकल रॅली काढण्यात आली. त्यानंतर फाटक कॅपिटल येथील हॉलमध्ये दापोली, खेड, मंडणगड येथील कार्यकारिणीने त्यांचा सत्कार केला.
त्यानंतर पदाधिकारी वगळता अन्य कार्यकर्त्यांसमवेत त्यांनी प्रत्यक्ष चर्चा करून पक्षबांधणीसंदर्भातील अडचणी जाणून घेतल्या. या वेळी मनसेचे नेते वैभव खेडेकर, सचिन गायकवाड, दापोली तालुकाध्यक्ष नितीन साठे, शहराध्यक्ष राकेश माळी, मनविसे तालुकाध्यक्ष साईराज देसाई, शहराध्यक्ष राहूल शिंदे यांच्यासह दापोली, खेड, मंडणगड तालुक्यातील विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76262 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top