पैसाफंडचे ९३ वर्षांचे शैक्षणिक योगदान मोलाचे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पैसाफंडचे ९३ वर्षांचे शैक्षणिक योगदान मोलाचे
पैसाफंडचे ९३ वर्षांचे शैक्षणिक योगदान मोलाचे

पैसाफंडचे ९३ वर्षांचे शैक्षणिक योगदान मोलाचे

sakal_logo
By

पैसाफंडचे ९३ वर्षांचे शैक्षणिक योगदान मोलाचे
ॲड. ओवेस पेचकर ; विद्यार्थी गुणगौरव सोहळा
संगमेश्वर, ता. ११ः मुलांना गुणगौरव समारंभातून प्रोत्साहन मिळत असते . सर्व विद्यार्थी आपापल्यापरिने अभ्यासात प्रगती करतात. सर्वांना जरी सारखे यश मिळाले नाही तरी यशासाठी प्रयत्न कायम ठेवायला हवेत. आपणही सर्वसामान्य विद्यार्थी होतो; मात्र आपणही यशाच्या जोरावर आज गेली दहा वर्षे उच्च न्यायालयात वकिली करत आहोत. अभ्यासाच्यादृष्टीने २३ देशात आजवर आपण प्रवास केला आहे. पैसाफंडचे गेले ९३ वर्षांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान मोलाचे असून अभिनंदनीय आहे. विद्यार्थ्यांच्या यशाचे खरे शिल्पकार संस्थाचालक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी असतात, असे गौरवोद्गार ॲड. ओवेस पेचकर यांनी काढले.
पैसाफंड इंग्लिश स्कूलमधील यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्यात पेचकर म्हणाले की, पैसाफंड शिक्षणसंस्था स्थापनेचा व्यापारीवर्गाचा हेतू विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात यश मिळवून साध्य करून दाखवला आहे. शिक्षण संस्था चालवणे सध्या खूप कठीण आहे. याचा अनुभव आपण स्वतः एक शिक्षण संस्था चालवत असल्याने घेत आहोत. आपल्या वकिली प्रवासाची सविस्तर माहितीही पेचकर यांनी या वेळी विद्यार्थ्यांना दिली. उच्च शिक्षणाचा निर्णय घेताना प्रथम पालक, शिक्षक, संस्थाचालक यांच्याजवळ चर्चा करा आणि स्वतःलाही याबाबत प्रश्न विचारा तुम्हाला नक्कीच मार्ग सापडेल, असा सल्ला त्यांनी या वेळी दिला. कोकण बोर्ड नेहमीच प्रथम क्रमांकावर आहे; मात्र उच्च शिक्षणातही युपीएससी, आयपीएस, एमपीएससीसारख्या परीक्षांमध्येदेखील कोकणातील विद्यार्थी आघाडीवर असायला हवेत, अशी अपेक्षा व्यक्त करताना सोशल मीडियाचा फार वापर करू नका, सर्व विद्यार्थ्यांनी कोकणचे नाव उज्ज्वल करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
मुख्याध्यापक खामकर यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला. मान्यवरांच्या हस्ते आदर्श विद्यार्थी म्हणून सन २०-२१ साक्षी दळी, वैभव सप्रे, सन २१-२२ तन्वी शिंदे, आदित्य जाधव यांना गौरवण्यात आले. प्रशालेत दहावी-बारावीत प्रथम, प्रशालेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.
संस्था सचिव धनंजय शेट्ये म्हणाले की, पेचकर यांच्यासारखा सच्चा कोकणप्रेमी आणि उच्च न्यायालयातील प्रथितयश विधीज्ञ आज पारितोषिक वितरण समारंभासाठी उपस्थित राहिले, याचा व्यापारी पैसाफंड संस्थेला नक्कीच अभिमान आहे. पेचकर यांचे कोकणप्रेम पाहून आपण भारावून गेलो.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76278 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..