
भाजप राज्य तोडण्याचा प्रयत्न करत आहे
rat११p३४.JPG
L३५१९६
चिपळूणः निर्धार मेळाव्यात मार्गदर्शन करताना आमदार भास्कर जाधव.
-rat११p३५.JPG ः
३५१९७
मेळाव्यासाठी जमलेले शिवसेनेचे कार्यकर्ते.
------------
भाजपकडून राज्य तोडण्याचा प्रयत्न
भास्कर जाधव ; शिवसेनेच्या झेंड्याखाली एकत्र येऊया
चिपळूण, ता. ११ ः महाराष्ट्रात केवळ शिवसेनेसमोर मोठे संकट उभे आहे असे नाही तर भाजप संपूर्ण राज्य तोडण्याचा प्रयत्न करत आहे. मराठी माणसाला तोडण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्या विरोधात आपण शिवसेनेच्या झेंड्याखाली एकत्र येणे गरजेचे आहे, असे आवाहन शिवसेने नेता भास्कर जाधव यानी आज चिपळूण येथे केले.
चिपळूण आणि गुहागर विधानसभा मतदार संघातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा आज कापसाळ येथील माटे सभागृहात झाला. या वेळी आमदार जाधव म्हणाले, बंडखोर आमदार भाजपबरोबर गेले असले तरी राज्यात आपली तटबंदी मोठी आहे. तिला कोणाची नजर लागू नये यासाठी हा निर्धार मेळावा आपण घेत नाही तर भविष्यामध्ये महाराष्ट्रात उलथापालथ खूप मोठी आहे. आपल्याला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर भाजपचे नेते सागंत होते, हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे; पण मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या भाषणात आमचे कर्तेधर्ते देवेंद्र फडणवीस आहेत, हे सर्वांसमोर सांगितले.
मुख्यमंत्री ठाकरेंचे सरकार अडचणीत आणण्यासाठी केंद्रीय यंत्रणेचा वापर झाला. खोट्या चौकशा लावण्यात आल्या. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची २१० वेळा चौकशी झाली. महाराष्ट्रात १९९२ मध्ये बॉम्बस्फोट झाले. त्याचवेळी दंगली झाल्या. मोदी आठ वर्ष केंद्रात आहेत. पाच वर्षात राज्यात देवेंद्र फडणीवस यांचे सरकार होते. तेव्हा त्यांना दाऊद आठवला नाही; मात्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर भाजपला दाऊद आठवला, याचे विशेष वाटते. केंद्राने ज्यांच्या चौकशा लावल्या त्यांनाच संरक्षण देण्याची वेळ केंद्रावर आली. किरीट सोमय्या हा केवळ मराठी माणसाला छळतोय. भाजपला केवळ मराठी माणसे भ्रष्टाचारी वाटत आहे. मुंबईतील चांगले उद्योग गुजरातला नेले जात आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून विनायक राऊत यांना पु्न्हा लोकसभेत आम्ही पाठवू, असा निर्धारही त्यांनी या वेळी केला.
--------------
चौकट
पक्षात राहून गद्दारी करणारे अधिक घातक
देवेंद्र फडणवीस पाच वर्षे मुख्यमंत्री असताना जेवढा निधी रत्नागिरी जिल्ह्याला मिळाला नाही, त्यापेक्षा जास्त निधी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दोन वर्षात मिळाला. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेत पडलेली फूट विकासाला घातक आहे. जे गेले ते उघडपणे गेले; मात्र पक्षात राहून जे पक्षाशी गद्दारी करतात ते कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीला मदत करण्याची सूचना करतात हे सर्वात घातक आहे, असे आमदार भास्कर जाधव यांनी सांगितले.
------------------
चौकट
दंगली घडवणे म्हणजे शिवसेनेचे हिंदुत्व नाही
उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडण्यासाठी भाजपने कावळे, चिमणी सोडले होते. ईडीचा वापर केला. मराठी माणसाला त्रास देऊन पाहिला तरीही सरकार पडले नाही, म्हणून हिंदुत्वाचा विषय पुढे आणला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी सभागृहात मी हिंदू आहे आणि भविष्यातही राहीन, असे सांगितले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभागृहात मी हिंदू आहे, असे बोलण्याची हिंमत होईल का? देशात दंगली घडवणे म्हणजे हिंदुत्व नाही, असे भास्कर जाधव यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76284 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..