कणकवली : नलावडे प्रेस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवली : नलावडे प्रेस
कणकवली : नलावडे प्रेस

कणकवली : नलावडे प्रेस

sakal_logo
By

35285
कणकवली : पत्रकार परिषदेत बोलताना नगराध्यक्ष समीर नलावडे बाजूला बंडू हर्णे, संजय कामतेकर, विराज भोसले, किशोर राणे आदी.

शिवरायांचे स्मारक का उभारले नाही?

समीर नलावडे : कणकवलीतील पुतळा प्रकरणी जरूर न्यायालयात जा

कणकवली, ता.११ : गेली अडीच वर्षे राज्‍यात शिवसेनेची सत्ता असताना, स्वत:ला शिवसेनेचे नेते म्‍हणवणाऱ्या संदेश पारकरांना छत्रपती शिवरायांचे स्मारक उभारता आले नाही. आता पुतळा स्थलांतरणानंतर त्‍यांना शिवस्मारकाची आठवण झाली आहे. पुतळा हलविण्या प्रकरणी ते न्यायालयात जाण्याचा इशारा देत आहेत. मात्र त्‍यांची इशारा देत बसण्यापेक्षा जरूर न्यायालयात दाद मागावी असे आव्हान कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी आज दिले.
येथील नगराध्यक्ष दालनात श्री.नलावडे यांनी पत्रकार परिषद घेतली. उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, संजय कामतेकर, विराज भोसले, किशोर राणे उपस्थित होते. नलावडे म्‍हणाले, राज्‍यात शिवसेनेचे सरकार तसेच जिल्ह्यातील दोन आमदार, एक खासदार आणि पालकमंत्री देखील शिवसेनेचा होता. तरीही संदेश पारकर यांना छत्रपतींचा पुतळा स्थलांतर करता आला नाही. राज्‍यात सत्ता बदल होताच चार दिवसांत हा प्रश्‍न आम्‍ही मार्गी लावला. त्‍यामुळे पारकरांना पोटशूळ निर्माण झाला आहे. रातोरात पुतळा हटवला, गुंडांचे आणि लुटारूंचे सरकार असे आरोप पारकर करत आहेत.
ते म्‍हणाले, मूळात संदेश पारकर हेच गुंड प्रवृत्तीचे आहेत. शहरातील एका व्यापाऱ्याने पारकर यांच्याकडे उधारीचा तगादा लावला, म्‍हणून त्‍याला मारहाण झाली होती. याच पारकरांनी तत्‍कालीन पोलिस निरीक्षक श्री.साळुंखे यांच्या कॉलरला हात घातला होता. एवढेच नव्हे तर काही पतसंस्थांकडून त्‍यांनी लाखोंची कर्जे घेतली आणि परतफेड केली नाही. त्‍यामुळे त्‍या पतसंस्थाच बंद कराव्या लागल्या. त्‍यामुळे पारकरांनी दुसऱ्यांवर गुंडगिरी, लुटारू असे आरोप करणे हास्यास्पद आहे.
---------------
चौकट
लपून छपून पालीवारी करू नका
राज्‍यात सत्ता बदल झाल्‍यानंतर शिवसेनेत असणारे पारकर हे प्रत्‍यक्षात शिंदे गटाच्या संपर्कात आहेत. त्‍यांनी बंडखोर आमदार उदय सामंत यांचे निवासस्थान असलेल्‍या पाली येथे वाऱ्या सुरू केल्‍या आहेत. तर पारकर यांचा लहान भाऊ सातत्‍याने शिवसेनेचे दुसरे बंडखोर नेते दीपक केसरकर यांना फोन करत आहेत. या सर्वांचे पुरावे देखील आमच्याकडे आहेत; मात्र लपून छपून पाली वारी करण्यापेक्षा पारकरांनी जाहीरपणे शिवसेनेच्या बंडखोर गटात जाण्याची हिंमत दाखवावी, असे आव्हान नलावडेंनी दिले.
----------
चौकट
पद नसल्‍याने पारकरांची तगमग
संदेश पारकर हे अडीच वर्षापूर्वी शिवसेनेत गेले. मात्र त्‍यांना आतापर्यंत पक्षाने कुठलंही पद दिलेलं नाही. त्‍यांच्याकडे कार्यकर्ते नाहीत आणि कामासाठी माणसंही येत नाहीत. त्‍यामुळे स्वयंघोषित नेतेपद मिरवणाऱ्या पारकरांची मोठी तगमग झाली आहे. याच नैराश्‍यातून ते आमदार, नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांचेवर बेछूट आरोप करत आहेत. मात्र त्‍यांच्या आरोपांना आम्‍ही किंमत देत नाही असेही श्री.नलावडे म्‍हणाले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76304 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..