विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसवर विजेचा खांब कोसळला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या  बसवर विजेचा खांब कोसळला
विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसवर विजेचा खांब कोसळला

विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसवर विजेचा खांब कोसळला

sakal_logo
By

rat११p४०.jpg
३५२७६
रत्नागिरीः नाणीज येथे विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसवर विद्युत खांब कोसळला.
-------
बसवर विजेचा खांब कोसळला
सर्व विद्यार्थी सुखरुप : गंजलेले खांब काढण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ११ ः नांदिवली (ता. लांजा) येथून नाणीज येथे दररोज विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसवर सोमवारी (ता. ११) सकाळी नऊच्या सुमारास रस्त्याच्या कडेला असलेला विद्युत खांब कोसळला. तो बसच्या बोनेटवर पडला. सुदैवाने विद्यार्थ्यांना इजा झाली नाही. सर्व विद्यार्थी सुरक्षित आहेत.
हे सर्व विद्यार्थी माध्यमिक विद्यामंदिर नाणीज येथे शिक्षणासाठी नांदिवली भागातून येतात. बाजारपेठ येथील प्राथमिक शाळेसमोरील विजेचा खांब गेले कित्येक दिवस धोकादायक बनलेला होता; पण तक्रारीनंतरही त्याकडे महावितरणने दुर्लक्ष केले होते; मात्र तोच खांब गाडीच्या
(एमएच-०८-एपी-१२८६) पुढच्या भागावर पडला. त्यामुळे मागे बसलेल्या विद्यार्थ्यांना इजा झाली नाही. बसचालक प्रशांत पांचाळ यांनी प्रसंगावधानाने गाडी वेळेत थांबवली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसवर खांब कोसळल्याची वार्ता परिसरात वाऱ्यासारखी पसरली. पालक घाबरून गेले. अनेक पालकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर अनेक तरुण मदतीला धावले. त्यांनी खांब बाजूला केला. बसला मोकळे करण्यात आले. नाणीज येथील काही तरुण विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूलबसवर काम करत असतात ते मदतीला आले. नाणीज येथे रस्त्याच्या कडेला अनेक जुनाट वृक्ष आहेत ते देखील कोसळत असतात. रविवारी अशाच पद्धतीने एक झाड ग्रामपंचायतीसमोर पडले होते. ते नाणीज येथील तारी बंधू बाजूला करत होते. हा खांब कोसळल्यानंतर दुसरे झाडे तेथे कोसळले. सुदैवाने तारी बंधू आणि बाकीचे नागरिक वाचले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76310 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..