कणकवलीत फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ; १५ संघांचा सहभाग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवलीत फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ; १५ संघांचा सहभाग
कणकवलीत फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ; १५ संघांचा सहभाग

कणकवलीत फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ; १५ संघांचा सहभाग

sakal_logo
By

35297
कणकवली : शहरातील विद्यामंदिर हायस्कूलच्या पटांगणावर फुटबॉल स्पर्धेचे उद्‌घाटन करताना नगरसेवक रूपेश नार्वेकर.

कणकवलीत फुटबॉल स्पर्धेला
प्रारंभ; १५ संघांचा सहभाग

संदेश पारकरांच्या वाढदिवसाचे निमित्त

कणकवली, ता.११ : शिवसेनेचे नेते संदेश पारकर यांच्या वाढदिवासानिमित्त शहरातील विद्यामंदिर हायस्कूलच्या पटांगणात आज फुटबॉल स्पर्धेचे उद्‌घाटन नगरसेवक रूपेश नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत तालुक्‍यातील १५ संघ सहभागी झाले आहेत.
पारकर यांचा वाढदिवस १५ जुलै रोजी होणार आहे. यानिमित्ताने शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले आहे. यात फुटबॉल स्पर्धेचा समावेश आहे. संदेश पारकर मित्रमंडळाकडून ही स्पर्धा आयोजित केला आहे. या स्पर्धेला युवा वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. स्पर्धा उद्‌घाटन कार्यक्रमावेळी युवासेना शहरप्रमुख आदित्य सापळे, गौरव हर्णे, वैभव मालंडकर. अमित मयेकर, जय शेट्ये, संतोष पुजारे, चंदन पाटील, कौशिक पारकर, अक्षय भोगटे आदी उपस्थित होते. विजेत्या संघास वाढदिवसादिनी गौरविण्यात येणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76325 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top