
वीज कर्मचारी वाढविण्याची आंबोलीवासीयांची मागणी
वीज कर्मचारी वाढविण्याची
आंबोलीवासीयांची मागणी
आंबोली, ता. ११ ः येथील विजेच्या समस्यांसंदर्भात वीज अधीक्षकांनी तत्काळ दखल घेवून आंबोलीत कर्मचारी वाढवावेत, अशी मागणी आंबोली ग्रामस्थांनी केली आहे.
येथील वर्षा पर्यटन नियोजनाबाबतच्या बैठकीत तहसीलदारांनी कुडाळ येथून जास्त स्टाफ उपलब्ध करण्याबाबत पत्र देतो, असे सांगितले होते; मात्र तसे काही झाले नाही. आंबोलीत यापूर्वी ४ ते ५ कर्मचारी होते. आता फक्त २ कर्मचाऱ्यांवर डोलारा आहे. शिवाय कनेक्शन आणि उत्पन्नही वाढले आहे; मात्र त्यानुसार कर्मचारी वाढविले नाहीत. यासंदर्भात वारंवार मागणी करूनही महावितरणने लक्ष दिले नाही. आमदार दीपक केसरकर यांनीही या प्रश्नाकडे लक्ष घातले नाही. दरवर्षी आंबोलीत पावसाळ्यात वीजप्रश्न निर्माण होतो. त्यामुळे पावसाळ्यात तरी कर्मचारी जास्त ठेवणे गरजेचे आहे. वर्षा पर्यटनासाठी हजारो लोक आंबोलीत येतात; मात्र लाईट नसल्यामुळे त्यांच्यासह पर्यटन व्यावसायकांची देखील गैरसोय होते. आंबोलीत धुके आणि जास्त पाऊस असल्याने घरातील वीज दिवसादेखील सुरू ठेवावी लागते. त्यामुळे प्रशासनाने आणि वीज वितरणने याकडे तत्काळ लक्ष द्यावे. तसेच याठिकाणी तांत्रिक अधिकारी ठेवावा, अशी मागणी आंबोली ग्रामस्थांनी केली आहे.
...............
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76327 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..