जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान देणार दहा रुग्णवाहिका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान देणार दहा रुग्णवाहिका
जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान देणार दहा रुग्णवाहिका

जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान देणार दहा रुग्णवाहिका

sakal_logo
By

जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज
संस्थान देणार दहा रुग्णवाहिका
रत्नागिरी, ता. ११ः श्री क्षेत्र नाणीजधाम येथे बुधवारी (ता. १३) गुरूपौर्णिमा वारी उत्सव सोहळा मोठ्या दिमाखात होत आहे. त्यादिवशी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे आणखी दहा रुग्णवाहिका समाजाच्या सेवेत दाखल होणार आहेत. गुरुपूजन सोहळ्यासाठी लाखो भाविक सुंदरगडावर येणार आहेत.
सोहळ्याची सुरूवात मंगळवारी १२ जुलै रोजी होणार आहे. सकाळच्या धार्मिक विधीनंतर १० ते १ या कालावधीत श्री सद्गुरू याग व अन्नदान विधी होईल. याच दरम्यान देवदेवतांना सोहळ्याचे निमंत्रण देणाऱ्या मिरवणुका होतील. त्यांची जबाबदारी वलसाड (गुजरात) जिल्हा सेवा समितीकडे नाथांचे माहेरची जबाबदारी आहे. गोवा जिल्हा सेवा समितीकडे वरद चिंतामणीची जबाबदारी, उत्तर रायगडकडे प्रभू श्रीराम मंदिर व संतशिरोणी गजानन महाराज मुख्य मंदिराची जबाबदारी नागपूर जिल्हा सेवा समितीकडे आहे. बुधवारी हा सोहळ्याचा मुख्य दिवस आहे. दुपारी श्री सद्गुरू याग व अन्नदान विधी पूर्णाहुती आहे. २ ते ५ या कालावधीत चरण दर्शन व रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा आहे. महामार्गावर होणार्‍या अपघातग्रस्तांना तातडीने रुग्णालयात पोहोचवण्याचे कार्य संस्थानच्या २७ रुग्णवाहिका गेले एक तप अव्याहतपणे करीत आहेत. त्यात आणखी १० रुग्णवाहिका समाजसेवेत दाखल होत आहेत. त्यांचा लोकार्पण सोहळा गुरुपौर्णिेला आहे. आता ३७ रुग्णवाहिका अपघातग्रस्तांच्या सेवेत असतील. त्याचबरोबर एक हजार भाविकांची सोय करणारे यात्री निवासही यावेळी भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहे. रात्री दक्षिण पीठाचे उत्तराधिकारी प.पू. कानिफनाथ महाराज यांचे अमृतमय प्रवचन होईल. त्यानंतर सर्वांचे आकर्षण असलेले जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचे अमृतमय प्रवचन होईल. या दोन्ही दिवस २४ तास महाप्रसाद, मोफत आरोग्य शिबिर होणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76330 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top