राजगुरुंच्या वास्तूकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर कारवाईची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजगुरुंच्या वास्तूकडे दुर्लक्ष
करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
राजगुरुंच्या वास्तूकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

राजगुरुंच्या वास्तूकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

sakal_logo
By

फोटो नाही

टीपः swt११२२.jpg मध्ये फोटो आहे.
सिंधुदुर्गनगरी ः निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांना निवेदन देताना हिंदू जनजागृती समितीचे पदाधिकारी.

राजगुरुंच्या वास्तूकडे दुर्लक्ष

हिंदू जनजागृती; कडक कारवाईची मागणी

सिंधुदुर्गनगरी, ता. ११ ः राजगुरुनगर (जि.पुणे) येथील हुतात्मा राजगुरु यांचे जन्मस्थळ असलेल्या वाड्याच्या प्रवेशद्वाराची पडझड झाली आहे. या प्रकरणी दोषी असलेल्या पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणी निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांच्याकडे हिंदु जनजागृती समितीमार्फत निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांचे जन्मस्थळ असलेला वाडा राजगुरुनगर (जि.पुणे) येथे आहे. हा वाडा १८ वर्षांपूर्वी राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात आला होता. या ऐतिहासिक वाड्याचे संरक्षण आणि संवर्धन करण्याचे दायित्व पुरातत्त्व विभागाकडे असतांना २७ जून २०२२ या दिवशी वाड्याच्या प्रवेशद्वाराचा काही भाग कोसळला. त्यामुळे पुरातत्व विभाग आणि जिल्हा प्रशासन यांच्याविषयी देशप्रेमी नागरीकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. एकूणच वास्तूकडे पुरातत्त्व विभाग आणि जिल्हा प्रशासन यांचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. या वास्तूकडे डोळेझाक करणाऱ्या पुरातत्त्व विभागाच्या दोषी अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे, या संदर्भातील तक्रारीकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. या वास्तूची आणखी हानी होऊ नये, या दृष्टीने तत्काळ पुढील उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवासी उपजिल्हाधिकारी भडकवाड यांच्याकडे हिंदु जनजागृती समितीमार्फत निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी निवेदन सादर करताना गजानन मुंज, विजय मिसाळ उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76377 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..