आषाढी एकादशीनिमित्त कट्टा सेवांगणतर्फे दिंडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आषाढी एकादशीनिमित्त कट्टा सेवांगणतर्फे दिंडी
आषाढी एकादशीनिमित्त कट्टा सेवांगणतर्फे दिंडी

आषाढी एकादशीनिमित्त कट्टा सेवांगणतर्फे दिंडी

sakal_logo
By

35381
कट्टा ः दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी साकारलेली वेशभूषा.

आषाढी एकादशीनिमित्त
कट्टा सेवांगणतर्फे दिंडी
ओरोस ः बॅ. नाथ पै सेवांगण कट्टा येथे आषाढी एकादशीनिमित्त कट्टा एसटी स्टँड ते विठ्ठल मंदिर कट्टा अशी दिंडी काढण्यात आली. या दिंडीमध्ये कट्टा परिसरातील कट्टा-गुरामवाडी व कुणकवळे शाळेतील मुले व प्रामुख्याने महिला पालक सहभागी झाले होते. या दिंडीमध्ये श्राव्य झांटये याने साकारलेला विठुराया, तनिषा म्हाडगुत हिने साकारलेल्या मुक्ताईने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कुणकवळेतील मुलांनी वारकरी पेहराव केला होता. पाऊस असूनही मुलांचा उत्साह उल्लेखनीय होता. पेंडुर येथील प्रसिद्ध गायक व कला दिग्दर्शक भारत पेंडुरकर यांच्या उपस्थितीत अभंग गायनाचा शुभारंभ झाला. गीता नाईक यांनी अभंग सादर केले. श्री. पेंडुरकर यांच्या ‘जय जय रामकृष्ण हरी’ व सुजाता पावसकर यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. या उपक्रमात किशोर शिरोडकर, बापू तळवडेकर, अरविंद शंकरदास, अरविंद पेंडुरकर, श्री. पवार, स्नेहा पावसकर, मधुरा माडये, गौरी झांट्ये, संदेश वाईरकर आदी उपस्थित होते.
.....................
35379
कट्टा ः सत्कार कार्यक्रमात संघटनेचे पदाधिकारी, विद्यार्थी व सभासद.

मालवणात गुणवंतांचा गौरव
ओरोस ः महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखा मालवणच्या वतीने संघटना सभासदांच्या दहावी व बारावी उत्तीर्ण पाल्यांचा सत्कार सोहळा नुकताच शाळा कट्टा नं. १ येथे तालुकाध्यक्ष सुयोग धामापूरकर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. राज्य उपाध्यक्ष राजन कोरगावकर यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. तालुका सचिव जीवन हजारे यांनी प्रास्ताविक केले. व्यासपीठावर तालुकाध्यक्ष सुयोग धामापूरकर, जिल्हाध्यक्ष नितिन कदम, नारायण नाईक, ज्येष्ठ मार्गदर्शक भाई चव्हाण, पतपेढी अध्यक्ष दादा जांभवडेकर, जिल्हा शिक्षक नेते नंदकुमार राणे, जिल्हा सरचिटणीस सचिन मदने, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रसेन पाताडे, महिला जिल्हा सरचिटणीस वैभवी कसालकर, मालवण तालुका शिक्षक नेते मंगेश कांबळी, मालवण पतपेढी संचालक राजेंद्र प्रसाद गाड, कार्याध्यक्ष रुपेश गरुड, प्रवक्ता नवनाथ भोळे, महिला आघाडी सचिव भाग्यश्री वाडकर आदी उपस्थित होते. प्रमिता तांबे यांनी सूत्रसंचलन केले. नवनाथ भोळे यांनी आभार मानले.
--
35378
दारुम ः येथे ‘बांधावरची शाळा’ उपक्रमात सहभागी विद्यार्थी.

दारुम शाळेचे विद्यार्थी बांधावर
तळेरे ः ‘बळीराजासाठी एक दिवस’ या उपक्रमातून जिल्हा परिषद शाळा दारुम नं. १ चे विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी शेतीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. शेतीचे महत्त्व व पध्दत मुलांना समजावी, यासाठी प्रकाश तळेकर व गोविंद तळेकर यांच्या शेतात हा उपक्रम घेतला. यावेळी सर्व मुलांनी शेती कामाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. यावेळी दारुम सरपंच सुनिंद्र सावंत, प्रदीप तळेकर, राजेंद्र माईणकर, प्रफुल्ल तळेकर, मुख्याध्यापक महेंद्र पावसकर, शिक्षक दिनेश जंगले, संदीप ब्रम्हदंडे, शशिकांत तांबे, अंगणवाडी मदतनीस सौ. कर्ले, पालक, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनीही या उपक्रमात सहभाग घेतला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76454 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..