
टुडे पान दोन मेन-कवी, गझलकारांचे साहित्य जपणे गरजेचे
L३५३८०
वैभववाडी ः कवी मधुसुदन नानीवडेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालुन त्यांना श्रंध्दाजली वाहण्यात आली.
कवी, गझलकारांचे साहित्य जपणे गरजेचे
उपस्थितांच्या भावना ः वैभववाडीत मधुरांजली कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. १२ ः कवी आणि गझलकार यांचे साहित्य हे अजरामर आहे. तरूण, जेष्ठ आणि महिलांसह सर्वच वर्गाला भावणारे त्यांचे काव्य आणि गझलरूपी साहित्य आपण जपायला हवे, असे मत उपस्थितांनी येथे व्यक्त केले.
येथील आनंदीबाई रावराणे कला व वाणिज्य महाविद्यालयात कवी मधुसुदन नानीवडेकर यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त मधुरांजली कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला संस्थेचे संचालक प्रभानंद रावराणे, उपनगराध्यक्ष संजय सावंत, स्थानिक समितीचे अध्यक्ष सज्जन रावराणे, प्रमोद रावराणे, प्राचार्य डॉ. सी. एस. काकडे, उपप्राचार्य डी. एम. कांबळे, संजय रावराणे, प्रा. नामदेव गवळी, प्रा. संजीवनी पाटील, प्रा. एस. एन. पाटील आदी उपस्थित होते.
कवी आणि गझलकार नानीवडेकर यांच्या कविता आणि गझलांमध्ये ग्रामीण जीवनशैलीचे हुबेहुब दर्शन घडवुन आणले गेले आहे. घराघरात घडणाऱ्या लहान मोठ्या गोष्टींचे त्यांनी काव्यांत रूपांतर केले आहे. राजकारण, समाजकारणातील प्रत्येक घटनाक्रमावर त्यांनी काव्य आणि गझलेतून प्रकाश टाकला आहे. ग्रामीण भागातील महिलांची पाण्यासाठी होणारी फरपट त्यांनी गझलेतून मांडली आणि ती गझल रसिकांना खुपच भावली आहे. त्यामुळे नानीवडेकरांचे साहित्य समाजातील प्रत्येक घटकाला उपयुक्त आहे. त्यामुळे ते जपायलाच हवे, असे मत सर्वानी व्यक्त केले. यावेळी संस्थेचे संचालक प्रभानंद रावराणे यांनी नानीवडेकरांचे साहित्य एकत्रीकरण आणि त्यांची जपणुक करण्यासाठी येणारा सर्व खर्च आपण करणार असल्याचे जाहीर केले. या कार्यक्रमामध्ये नानीवडेकर यांच्या चांदणे नदीपात्रातील या काव्यसंग्रहातील कवितांचे वाचन महाविद्यालयातील विद्यार्थ्यानी केले. याशिवाय प्रा. गवळी, प्रा. हेदुळकर, प्रा. कारेकर, प्रा. कांबळे यांनी स्वरचित आणि कवी नानीवडेकरांच्या कवितांचे वाचन केले. या कार्यक्रमात उपस्थितांनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचलन प्रा. सौ. पाटील यांनी केले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76455 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..