मळगाव येथे 23 ला ''शाळा तिथे कोमसाप'' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मळगाव येथे 23 ला 
''शाळा तिथे कोमसाप''
मळगाव येथे 23 ला ''शाळा तिथे कोमसाप''

मळगाव येथे 23 ला ''शाळा तिथे कोमसाप''

sakal_logo
By

L३५३७६

सावंतवाडी ः रोटरी अध्यक्ष विनया बाड यांचा सत्कार करताना अॅड. संतोष सावंत व अन्य.

मळगाव येथे २३ ला
''शाळा तिथे कोमसाप''
अॅड. संतोष सावंत ः विविध कार्यक्रमांचे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १२ ः येथील कोकण मराठी साहित्य परिषदेच्यावतीने ''गाव अन् शाळा तिथे कोमसाप'' हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी मळगाव गावाची व हायस्कूलची निवड करण्यात आली आहे. त्यानुसार येत्या २३ ला लोकमान्य टिळक जयंती दिवशी या अभिनव उपक्रमाची सुरुवात केली जाणार आहे. ९ ऑगस्टला क्रांतिदिन सावंतवाडीत आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती तालुकाध्यक्ष अॅड. संतोष सावंत यांनी दिली.
येथील पालिकेच्या बॅ. नाथ पै सभागृहातील पत्रकार कक्षात कोमसापच्या कार्यकारिणीची बैठक श्री. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी वर्षभरात विविध साहित्यिक, सामाजिक, शैक्षणिक आदी उपक्रम राबवायचे आहेत. त्यानुसार वर्षा ऋतूतील जे उपक्रम घेण्याचे यापूर्वी ठरले आहे, त्यानुसार जुलै महिन्यात ''कोमसाप आपल्या गावी शाळेत भेटीला'' हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी मळगाव इंग्लिश स्कूलची निवड करण्यात आली आहे. येत्या २३ ला सकाळी १० वाजता या उपक्रमाची सुरुवात केली जाणार आहे. मळगाव हायस्कूल आणि कोमसाप यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील विद्यार्थ्यांशी ''गप्पाटप्पा'' कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी कविता तसेच आवडीच्या एका पुस्तकाचे वाचन आदी कार्यक्रम घेतले जाणार आहेत. तसे नियोजन बैठकीत करण्यात आले, अशी माहिती अॅड. सावंत यांनी दिली.
यावेळी सचिव प्रतिभा चव्हाण, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, सहसचिव राजू तावडे, खजिनदार डॉ. प्रा. दीपक तुपकर, सुभाष गोवेकर, दीपक पटेकर, प्रा. रुपेश पाटील, ऋतुजा सावंत-भोसले, विनायक गावस आदी उपस्थित होते.
-------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76457 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..