''मधु कट्टा''चे तळेरेत अनावरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''मधु कट्टा''चे तळेरेत अनावरण
''मधु कट्टा''चे तळेरेत अनावरण

''मधु कट्टा''चे तळेरेत अनावरण

sakal_logo
By

L३५४३५

तळेरे ः येथे ''मधु कट्टा''चे अनावरण करताना डॉ. सौ. ऋचा कुलकर्णी. शेजारी सौ. श्रावणी मदभावे, सुरेश तळेकर, अशोक मुद्राळे, सतीश मदभावे, अक्षय मेस्त्री, दत्तात्रय मारकड व इतर

''मधु कट्टा''चे तळेरेत अनावरण
''संवाद परिवार''चा पुढाकार ः गझलकार नानिवडेकरांना अभिवादन
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. १२ ः ज्येष्ठ कवी, गझलकार मधुसूदन नानिवडेकर यांच्या प्रथम स्मृती दिनाचे औचित्य साधून तळेरे येथील डॉ. मिलिंद कुलकर्णी यांच्या चैतन्य नर्सिंग होमसमोरील प्रांगणात ''मधु कट्टा'' उभारण्यात आला. त्याचे अनावरण डॉ. सौ. ऋचा कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.
ज्येष्ठ कवी, पत्रकार, लेखक आणि रसिकांच्या मनावर अधिराज्य मिळवून गझलकार म्हणून संपूर्ण महाराष्ट्राभर नावलौकिक मिळवलेले नानिवडेकर हे चालतेबोलते विद्यापीठ होते. गझल प्रकाराला त्यांनी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले होते. राज्यभरातील नवोदित कवी, गझलकारांसाठी ते प्रेरणास्थान व मार्गदर्शक होते. त्यांच्या स्मृती चिरंतन जागविण्यासाठी संवाद परिवार, तळेरे आणि तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाने विशेष पुढाकार घेऊन नानिवडेकर यांना अभिप्रेत असलेले कार्य व त्यांचा वारसा जपण्यासाठी ''मधुस्मृती''च्या माध्यमातून सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
नानिवडेकरांच्या मार्गदर्शनाखाली तळेरे येथे संवाद परिवाराच्या माध्यमातून साहित्यिक विषयक चळवळ सुरू करण्यात आली होती. यासाठी नानिवडेकरांचे मोठे योगदान होते. त्यामुळेच या साहित्यिक कट्ट्याला त्यांचे नाव देण्याचा निर्णय संवाद परिवाराने घेतला होता. त्यानुसार या कट्टयाला ''मधु कट्टा'' असे नाव देण्यात आले. यानिमित्त नानिवडेकर यांना अभिवादन करून श्रध्दांजली वाहण्यात आली.
या प्रसंगी सुनील तळेकर ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश तळेकर, वाचनालयाचे माजी अध्यक्ष अशोक मुद्राळे, तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाचे अध्यक्ष दत्तात्रय मारकड, पत्रकार व ''अक्षरयात्री'' निकेत पावसकर, सचिव संजय खानविलकर, श्रावणी कॉम्प्युटर तळेरेच्या संचालिका व ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेच्या कणकवली तालुका महिला संघटक सौ. श्रावणी मदभावे, प्रज्ञांगण परिवाराचे संस्थापक सतीश मदभावे, युवा चित्रकार अक्षय मेस्त्री, सचिन विचारे व अन्य सहकारी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76499 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top