रस्त्यावर झाड पडल्याने निगुडेत वाहतूक ठप्प | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रस्त्यावर झाड पडल्याने निगुडेत वाहतूक ठप्प
रस्त्यावर झाड पडल्याने निगुडेत वाहतूक ठप्प

रस्त्यावर झाड पडल्याने निगुडेत वाहतूक ठप्प

sakal_logo
By

35436
निगुडे ः येथे रस्त्यावर पडलेले झाड. (छायाचित्र ः निलेश मोरजकर)

रस्त्यावर झाड पडल्याने
निगुडेत वाहतूक ठप्प
बांदा, ता. १२ ः मुसळधार पावसामुळे निगुडे-रोणापाल रस्त्यावर निगुडे ग्रामपंचायतीसमोर आज भले मोठे झाड पडून वाहतूक विस्कळीत झाली. सकाळची वेळ असल्याने महाविद्यालयात जाणारी एसटी व इंग्लिश मीडियमच्या बसेस अन्य मार्गाने हलवाव्या लागल्या. निगुडे उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी तत्काळ दखल घेऊन ग्रामस्थांच्या सहकार्याने झाड बाजूला केले.
तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका निगुडे गावाला बसला. ग्रामपंचायतीसमोर रस्त्यावर झाड उन्मळून पडले. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होता. विद्युत ताराही तुटून पडल्या होत्या. याची दखल घेत उपसरपंच गवंडे यांनी बांदा कनिष्ठ अभियंता अनिल यादव यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर महावितरणचे ठेकेदार सुनील राऊळ यांनी घटनास्थळी येत झाड हटवून तासाभरात वाहतूक सुरळीत केली. गावातील वायफायची तुटलेली केबलही दुरुस्त करण्यात आली. यावेळी महावितरणचे वायरमन श्री. कुडव, सामाजिक कार्यकर्ते वसंत जाधव, ग्रामपंचायत कर्मचारी संतोष राणे, लहू जाधव तसेच ग्रामस्थ विश्राम जाधव, सिद्धेश म्हाडगूत, बबली जाधव, गौतम जाधव, दादू म्हाडगुत आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76500 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top