म्हैसाळ हत्याकांड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

म्हैसाळ हत्याकांड
म्हैसाळ हत्याकांड

म्हैसाळ हत्याकांड

sakal_logo
By

लोगो ः म्हैसाळ हत्याकांड
...

मांत्रिकाने उचलले होते ८० लाख

वनमोरेंनी कर्ज घेऊन दिली होती रक्कम; पैसे परत मागितल्यानेच हत्या
सकाळ वृत्तसेवा
सांगली, ता. १२ : गुप्तधन मिळवून देण्यासाठी सोलापूर येथील मांत्रिक अब्बास बागवान याने वनमोरे कुटुंबीयांकडून तब्बल ८० लाखांची रक्कम उचलली होती, अशी खात्रीशीर माहिती समोर आली आहे. पगार व व्यवसायातून शिल्लक राहिलेली रक्कम शिवाय खासगी सावकार, पतसंस्थांतून कर्ज उचलून त्यांनी वर्षभरात ही रक्कम दिली होती. गुप्तधन मिळत नसल्याने आमचे ८० लाख परत कर, असा तगादा लावल्याने ही हत्या झाल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे.
डॉ. माणिक आणि पोपट वनमोरे यांना गुप्तधन शोधण्याचा नाद लागला होता. सोलापूर येथील मांत्रिक अब्बास बागवान याच्या संपर्कात ते आले होते. गुप्तधन शोधून देतो, असे त्याने सांगितले होते. पूजेसाठी, विविध विधींसाठी आणि वस्तू खरेदीसाठी वर्षभरात पैसे उकळले होते. ते पैसे त्याने बहिणीच्या खात्यावर घेतल्याचे तपासात पुढे आले आहे. वर्षभरात गुप्तधन मिळत नाही, मांत्रिकाकडून आपली फसवणूक होत आहे, असे समोर आल्यानंतर वनमोरे यांनी पैशांसाठी तगादा लावला होता.
सततचा तगादा लावल्याने मांत्रिकाने त्यांचा काटा काढण्याचा कट रचला. पुण्यातील मित्राच्या मदतीने विषारी औषधाच्या गोळ्या मागवून घेतल्या. १९ जूनची तारीख वनमोरे यांना दिली होती. त्याच दिवशी गुप्तधन मिळणार असल्याचे वनमोरे यांना सांगितले होते. कुटुंबातील सारे सदस्य घरी थांबा, असे सांगण्यात आले होते. पोपट वनमोरे यांची कन्या कोल्हापूर येथे बँकेत नोकरीला असल्याने आजीसोबत ती राहत होती. तिला ही शुक्रवारी रात्री बोलावून घेण्यात आले होते. १९ जून रोजी मांत्रिक बागवान व त्याचा चालक धीरज सुरवसे सोलापूरमधून म्हैसाळला आले. रात्री नऊच्या सुमारास डॉ. माणिक यांच्या घरी दोघांनी जेवण केले. डॉक्टर दाम्पत्यास अकराशे गहू काढून दिले. ते सात वेळा मोजण्यास सांगितले. त्यावेळी विषाच्या गोळ्या मांत्रिकाने आणल्या होत्या. त्याची पावडर करून त्या नऊ बाटल्यातील द्रव्यात टाकल्या. दरम्यान, रात्री एकच्या सुमारास पोपट वनमोरे यांच्या घरी मांत्रिक आणि त्याचा साथीदार गेला. साऱ्यांना टेरेसवर पाठवले. एकेकाला बोलवून घेत ते द्रव्य पिण्यास सांगितले. पोपट वनमोरे यांचे कुटुंब संपविले. याचपद्धतीने पहाटे चारच्या सुमारास डॉ. माणिक यांचे कुटुंब संपवले. खात्री झाल्यानंतर आत्महत्या भासवण्यासाठी खिशात चिठ्ठी ठेवून मांत्रिक आणि साथीदार पसार झाले होते.
दरम्यान, दुसऱ्या दिवशी ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांना प्राथमिक तपासात संशय बळावला. घातपात असल्याची शक्यता लक्षात आल्यानंतर तत्काळ तपासाची चक्रे फिरवली. गावातील सीसीटीव्ही फुटेज, काही तांत्रिक माहिती अधारे पोलिसांना सोलापूरचा मांत्रिक असल्याचे दिसून आले. त्यानंतर शिताफीने मांत्रिक आणि त्याच्या साथीदारास अटक केली. त्यानंतर पोलिस कोठडीत सारा घटनाक्रम उघडकीस आला. त्याला विषप्रयोगासाठी मदत करणाऱ्या मित्रासही पोलिसांनी पुण्यातून अटक केली. मांत्रिकाने वनमोरे कुटुंबीयांकडून तब्बल ८० लाखांची रक्कम उचलली होती, अशी खात्रीशीर माहिती समोर आली आहे. पगार व व्यवसायातून शिल्लक राहिलेली रक्कम शिवाय खासगी सावकार, पतसंस्थांतून कर्ज उचलून त्यांनी ही रक्कम दिली होती. तसेच काही पतसंस्थांमध्ये सोनेतारण कर्ज ही यांनी घेतले होते. पोलिसांकडून मात्र याबाबात गुप्तता पाळली जात आहे.
...
कोट

‘आम्ही त्यांच्या कुटुंबीयांशी बोललो त्यावेळी मोठी रक्कम मांत्रिकाने उकळल्याचे समोर आले. सोलापूरमध्ये मांत्रिकांची संघटना आहे. लोकांना गुप्तधनाचे आमिष दाखवून पैसे उकळले जातात. पैशांसाठी तगादा लावल्यानंतर अशी हत्या केली जाते. या संघटनेचा पर्दाफाश पोलिसांनी करायला हवा. आजच्या तरुणाला पैशांचे आमिष दाखवून तक्ररी करण्यासही भाग पाडले जात आहे. याबाबत ही समाजप्रबोधनाची गरज आहे.’
- नितीन चौगले,
शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान
...
चौकट

बँका, पतसंस्थांची
व्यवहार तपासणी
पोलिसांनी म्हैसाळ व परिसरातील बँका, पतसंस्था यांच्याशी वनमोरे यांनी केलेल्या व्यवहाराची तपासणी केली जात आहे. काही पतसंस्थांकडून उचलेले कर्ज याबाबतही माहिती घेतली जात आहे.
...

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76508 Txt Ratnagiri1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top