
टु २
-rat11p27.jpg
35187
ः साखरपा ः कोसळलेली संरक्षक भिंत.
-------------
शाळेची संरक्षक भिंत
सहा महिन्यात कोसळली
साखरपा ः नजीकच्या दाभोळे पितळेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेची संरक्षक भिंत कोसळली आहे. अवघ्या सहा महिन्यांपूर्वी बांधण्यात आलेली ही भिंत कोसळल्यामुळे बांधकामाच्या दर्जाविषयी शंका घेण्यात येत आहे. या शाळेला संरक्षक भिंत बांधण्यात आली होती. हे काम सहा महिन्यांपूर्वी करण्यात आले होते. असे असले तरी ही भिंत आता कोसळली आहे. इतकेच नाही तर या आधीही ही भिंत दोनवेळा कोसळली आहे. अवघ्या सहा महिन्यात तीनवेळा हीच भिंत कोसळल्यामुळे भिंत बांधण्याच्या कामाच्या दर्जाविषयी शंका घेण्यात येत आहे. या विषयाबाबत शनिवारी पालक आणि शालेय व्यवस्थापन समितीची बैठक पार पडली. शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सुनील पितळे यांनी या बांधकामाची चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76511 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..