
रत्नागिरी : लेह लडाखचे पर्यटन केवळ लष्करामुळेच शक्य
१) rat१२p१६.jpg
L35446
रत्नागिरी - सुरवातीला या परिसरात पोहोचल्यावर पर्यटकांनी पाळावयाच्या महत्त्वाच्या सूचनांकडे निर्देश करताना श्रीहर्ष मराठे.
...
२) rat१२p१७.jpg
L35447
- नुब्रा व्हॅलीतून मार्गक्रमण करताना अशा खडतर रस्त्याला तोंड द्यावे लागते.
...
३) rat१२p१८.jpg
35448
- डिस्किट मॉनस्ट्री
...
लेह लडाख पर्यटन केवळ लष्करामुळेच शक्य
श्रीहर्ष मराठे; दुचाकीस्वारही भारतीय सैन्याप्रती कृतज्ञभाव, अनुभव रोमांचकारी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १२ ः लेह लडाखची सफर आणि तिही बाईकवरून असेल तर साहसी क्रीडाप्रकार यामध्ये सहजच सामावून जाईल. तेथे पोहोचल्यावर आपले सैन्य तेथे कसे काम करते, हे पाहून ऊर अभिमानाने भरून येतो. ही सफर सायकल अथवा दुचाकीने पार करण्याची मर्दुमकी गाजवताना सर्वाधिक कृतज्ञभाव दाटून येतो, तो आपल्या लष्करासाठी, अशी कृतज्ञतेची भावना श्रीहर्ष मराठे यांनी व्यक्त केली.
मूळचे कासे-कळंबुशी येथील रहिवासी आणि पुणेस्थित असलेले मराठे यांनी नुकतीच ही सफर दुचाकीवरून केली. त्याबाबत ते म्हणाले की, तेथील विमानतळही लष्कराच्या ताब्यात आहे. पर्यटन शक्य व्हावे म्हणून तेथे क्षणाक्षणाला लष्कर आणि प्रशासनाला सज्ज राहावे लागते. खरेतर तेथील पर्यटन म्हणजे लष्कराला नागरी सुविधांसाठी अधिक काम करावे लागण्याची स्थिती आहे. मात्र, तरीही लष्कर आणि तेथील प्रशासन सतत झटत असते. त्यामुळे बाईक राईड ही अभिमानाची सुखावणारी भावना असली तरी लष्कराप्रती कृतज्ञता ही बाळगलीच पाहिजे.
प्रवासाबद्दल सांगताना ते म्हणाले, खूप वर्ष इच्छा होती, मोटर सायकलवरून लेह लडाख फिरायची. या वर्षी तो योग आला. (Youth hostel association of India)चे साह्य लाभले. एकेक जण जोडले गेले. ४ जण पुण्याहून आणि दोघे नाशिकहून. २३ ते ६३ असा वयोगट. प्रत्येकाचे व्यवसायही वेगवेगळे. असे आम्ही ६ जण लेहला जायच्या ओढीने एकत्र आलो. व्हॉट्सॲप ग्रुप तयार झाला. जो, जो जाऊन आला, त्यांच्याकडून माहिती घेऊन ग्रुपवर टाकत गेलो. २९ जूनला विमानाने लेहला हजर झालो. विमानातून उतरण्याआधीच निसर्गाने आपले वेगळे दर्शन दिले. पहिल्याच दिवशी लक्षात आले, आपण भरभरून आणलेल्या गरम कपड्यांचा काही उपयोग नाही. ऊन खूप तापले होते. त्यात उच्च उंचीचा आजार (high altitude sickness)नी डोकं धरलं. थोड चाललं तरी धाप लागत होती. कॅम्पवरच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले, गरम पाणी पीत राहा. आपोआप बरे वाटेल. शक्य तो गोळ्या घेऊ नका. रात्री तरी थंडी पडेल, ही अपेक्षा फोल ठरली.
आमच्या हातात मोटरसायकल मिळाल्या आणि लेहजवळ असलेली मॅग्नेटिक हिल, इंडस सिंधूनदीचा संगम, पत्थर साहेब गुरुद्वारा, हॉल ऑफ फेम जोरावर किल्ला फिरून परत आलो. अंदाजे १०० कि.मी.ची राईड झाली. खूप ऊन होतं. हळूहळू तिथल्या वातावरणाशी (रात्री ८ वाजेपर्यंत उजेड आणि सकाळी ५च्या आधीच उजाडते.) समरस झालो.
--------------------------------
चौकट
रस्ता नंतर नाहीसा होत गेला....
तिसऱ्या दिवशी चांगला पासच्या दिशेने निघालो. रस्ता आधी खूप छान होता. नंतर नाहीसा होत गेला. मग खराब रस्त्यावरून वाटचाल करत दुपारी चांगला पास येथे पोहोचलो. (उंची१७५८५ फूट). सगळ्यांना दम लागत होता. जेमतेम १० मिनिटे तेथे थांबून पुढे Dubruk ला जायला निघालो. तेथून Pangong lake ला जायला निघालो. रस्ता बरा होता; पण वाटेत पाण्याचे ओहोळ पार करून जायची कसरत करत जावे लागली. एक ठिकाणी दरड कोसळली होती. त्यांनी ती जेसीबीच्यां मदतीने १० मिनिटात ती बाजूला केली आणि आम्ही Pangog lake la पोहोचलो. नयनरम्य दृश्य. सुंदर निळे आकाश, निळे पाणी अथांग. डोळ्यात साठता साठेना.
---------------
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76519 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..