कणकवली : कॉलेज कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवली : कॉलेज कार्यक्रम
कणकवली : कॉलेज कार्यक्रम

कणकवली : कॉलेज कार्यक्रम

sakal_logo
By

35456
कणकवली : येथील कणकवली कॉलेजमधील जागतिक लोकसंख्या दिन कार्यक्रमात बोलताना प्रा.डॉ.राजेंद्र मुंबरकर. शेजारी इतर.

लोकसंख्येची गुणात्मकतेत वाढ हवी

डॉ. मुंबरकर : कणकवली कॉलेजमध्ये जागतिक लोकसंख्या दिन

कणकवली, ता.१२ : आपल्‍या देशात संख्यात्मकदृष्ट्या लोकसंख्येची वाढ झाली आहे. जर लोकसंख्येची गुणात्मक वाढ केली तर हीच वाढलेली लोकसंख्या वरदान ठरेल, असे मत प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर यांनी येथे केले.
जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून कणकवली महाविद्यालयात भूगोल व अर्थशास्त्र विभागाच्यावतीने जागतिक लोकसंख्या दिन कार्यक्रम झाला. यावेळी प्राचार्य डॉ. मुंबरकर बोलत होते. यावेळी विज्ञान मंडळाचे सचिव डॉ. सोमनाथ कदम, डॉ. तेजस जयकर, डॉ. मारोती चव्हाण, डॉ. भिकाजी कांबळे, प्रा.सचिन दर्पे आदी उपस्थित होते.
डॉ. मुंबरकर म्‍हणाले, वाढत्या लोकसंख्येने देशाचे भवितव्यच धोक्यात आणले आहे. बेकारी, दारिद्र्य, उपासमार, गुन्हेगारी, भ्रष्टाचार, आर्थिक मागासलेपणा, आरोग्यविषयक सुविधांची टंचाई, अकार्यक्षमता आदी समस्यांनी देश त्रस्त आहे. राजकीय, सांस्कृतिक आणि धार्मिक समस्या अतिशय तीव्र होत असून अर्थकारणात लोकसंख्येची समस्या हा अत्यंत महत्त्वाचा यक्षप्रश्न बनला आहे. समाजाचे आर्थिक जीवन, आर्थिक कल्याण आणि यातून देशाचा आर्थिक विकास या तिन्ही बाबी लोकसंख्येशी निगडित आहेत. म्हणूनच वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण आणि वाढलेल्या लोकसंख्येचे सुयोग्य नियोजन करणे गरजेचे आहे. अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. युवराज महालिंगे यांनी विद्यार्थ्यांना जागतिक लोकसंख्या दिनाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. बुद्धेश सावंत यांनी सूत्रसंचलन केले. डॉ. बी. एल. राठोड यांनी आभार मानले.
--
दक्षतापूर्वक नियोजन हवे
मुंबरकर म्हणाले, १३५ कोटी लोकसंख्या असलेल्या भारतात जवळपास ६५ ते ७० कोटी फलदायी श्रमशक्तीचे भांडार आहे. या शक्तीचे आर्थिक शक्तीत रूपांतर करण्याचीच आता खरी गरज आहे. त्यासाठीच उच्च प्रतीचा मानवी विकास साधण्यासाठी निर्धार, दक्षतापूर्ण निर्याजन, कालबद्ध अंमलबजावणी आणि कार्यवाहीतील पारदर्शकतेची गरज आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76521 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top