नाचणीसाठी पीक विमा योजना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नाचणीसाठी पीक विमा योजना
नाचणीसाठी पीक विमा योजना

नाचणीसाठी पीक विमा योजना

sakal_logo
By

भात, नाचणीसाठी पीक विमा योजना

जिल्हा कृषी विभाग; ३१ जुलै अंतिम मुदत
रत्नागिरी, ता. १२ : नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा, यासाठी कृषी विभागामार्फत प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. यामध्ये जिल्ह्यासाठी भात आणि नाचणी या पिकांचा समावेश केला आहे. या योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२२ आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनंदा कुऱ्‍हाडे यांनी सांगितले.
रत्नागिरी जिल्ह्याकरिता शासनाकडून युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी नियुक्त केली आहे. योजनेत सहभागी शेतकऱ्यांना हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकाची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान, पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग इत्यादी बाबींमुळे उत्पादनात होणारी घट, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान या सर्व बाबींकरीता विमा संरक्षण लाभणार आहे.
ही योजना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी असून सर्व कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजना ऐच्छिक आहे. कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी भाग घेण्यास पात्र आहेत. शेतकरी विमा हप्ता खरीप हंगामासाठी २ टक्के, तसेच रब्बी हंगामासाठी १.५ टक्के तसेच खरीप व रब्बी हंगामातील नगदी पिकांसाठी ५ टक्के असा आहे. खरीप हंगाम २०२२ व रब्बी २२-२३ या एका वर्षाकरिता जोखीमस्तर अधिसूचित पिकासाठी ७० टक्के केला आहे. साधारण भात पिकाच्या ५० हजार विमा संरक्षित रकमेसाठी विमा हप्ता रक्कम १ हजार रुपये, तर नाचणीसाठी २० हजार रुपये, विमा संरक्षित रकमेसाठी विमा हप्ता रक्कम ४०० रुपये आहे.
---
चौकट
ऑनलाईन अर्ज
या योजनेत सहभागी होण्यासाठी शासनाचे अधिकृत संकेतस्थळ http://pmfby.gov.in किंवा संबंधित कंपनीचे संकेतस्थळ यावरूनही ऑनलाईन अर्ज करता येईल. पिकासाठी अर्ज सादर करताना बिगर कर्जदार, पीक लागवड नोंदणी प्रमाणपत्र, शेतकऱ्‍यांनी सातबारा उतारा, आधार क्रमांक संलग्न बँक खात्याचे तपशील सोबत जोडणे आवश्यक आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76591 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..