बांदा-वाफोली रस्ता खचला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बांदा-वाफोली
रस्ता खचला
बांदा-वाफोली रस्ता खचला

बांदा-वाफोली रस्ता खचला

sakal_logo
By

L35528

बांदा ः बांदा-वाफोली रस्ता खोदाईमुळे खचला आहे. (छायाचित्र ः नीलेश मोरजकर)

बांदा-वाफोली
रस्ता खचला
बांदाः गॅस पाईपलाईनच्या खोदाईमुळे रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी भेगा पडल्या असून, काही ठिकाणी रस्ता खचल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबई-गोवा महामार्गलगत वाफोली सेवा रस्त्याला दोन ठिकाणी भगदाड पडल्याने येथील रस्ता केव्हाही कोसळण्याच्या स्थितीत आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने याची तत्काळ दखल न घेतल्यास रस्ता पावसाळ्यात पूर्णपणे खचण्याची भीती व्यक्त होत आहे.
बांदा-दोडामार्ग रस्त्याची साईडपट्टी ठिकठिकाणी खचली आहे; मात्र आता मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाची देखील साईडपट्टी खोदाईमुळे खचली असल्याने वाहन चालकांतून संताप व्यक्त होत आहे. बांदा-वाफोली रस्त्यावर वाहतुकीची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. रात्रीच्या वेळी खड्डे निदर्शनास न आल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तत्काळ याबाबत कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76599 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..