दाभोळ ः | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दाभोळ ः
दाभोळ ः

दाभोळ ः

sakal_logo
By

कीड व्यवस्थापनसंदर्भात कार्यशाळा
८६ कृषी अधिकाऱ्यांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
दाभोळ, ता. १२ ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली व कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने भातपिकावरील कीड, रोग, सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प २०२२-२०२३ अंतर्गत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी, महाराष्ट्र शासन यांच्यासाठी भातपिकावरील कीड व रोग सर्वेक्षण व व्यवस्थापनसंदर्भात एकदिवसीय ऑनलाइन कार्यशाळेचे आयोजन केले होते. त्यात ८६ कृषी अधिकारी सहभागी झाले होते. ही ऑनलाइन कार्यशाळा कुलगुरू डॉ. संजय सावंत यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली. या वेळी त्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञान तसेच हवामान आधारित कृषिसल्ल्यांचा अंतर्भाव करण्यासंदर्भात सूचित केले. संशोधन संचालक, डॉ. पराग हळदणकर यांनी कृषी विद्यापीठातील संशोधन व कृषि विभागाच्या विस्तारकार्याची सांगड घालून योजना प्रभावीपणे राबवण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) विकास पाटील यांनी कीड व रोग निरीक्षणे योग्यरित्या घेण्याकरिता सूचना केल्या. विभागीय कृषी सहसंचालक (कोकण विभाग) अंकुश माने यांनी मार्गदर्शन केले. उद्घाटन कार्यक्रमात डॉ. नरंगलकर यांनी या हंगामातील भातपिकावरील कीड-रोग व्यवस्थापनासंदर्भात विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांकडून वेळोवेळी मार्गदर्शन देण्याची ग्वाही दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76608 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..