चिपळूण - सत्तेत येऊनही भाजप कार्यकर्ते सायलेंट मोडवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण - सत्तेत येऊनही भाजप कार्यकर्ते सायलेंट मोडवर
चिपळूण - सत्तेत येऊनही भाजप कार्यकर्ते सायलेंट मोडवर

चिपळूण - सत्तेत येऊनही भाजप कार्यकर्ते सायलेंट मोडवर

sakal_logo
By

भाजप चिन्ह वापरा
..........
सत्तेत येऊनही भाजप कार्यकर्त्यांत शांतता

राजकीय वर्तुळात आश्चर्य; केवळ आभासी आनंदोत्सव, ही वादळापूर्वीची शांतताः ताम्हणकर
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १२ ः राज्यातील राजकीय भूकंपानंतर महाविकास आघाडी सरकारला घरी जावे लागले. यात किंगमेकर असलेल्या भाजपने पुन्हा एकदा सत्ता काबीज केली; मात्र भाजप सत्तेत येऊनही चिपळूणसह जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत नाही. एरवी देशभरातील लहान-मोठ्या विजयाचे सेलिब्रेशन करणारे जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी राज्यात सत्ता स्थापनेनंतर शांतच आहेत. केवळ सोशल मीडियावर शुभेच्छा देण्यात येत असल्याने सत्ता परिवर्तनानंतर भाजप शांत असल्याबद्दल राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यात भाजपने मजबूत संघटन तयार करण्यास सुरवात केली आहे. भाजपने लहान-मोठे आंदोलन केले तसेच देशभरातील लहान-मोठ्या विजयाचे जल्लोषही केला. राज्यसभेत भाजपचा तिसरा आणि विधान परिषदेत पाचवा उमेदवार निवडून आल्यानंतर या विजयाचा जल्लोष भाजपने केला. राज्यातील सत्ता परिवर्तनानंतरही मोठा जल्लोष होईल, अशी अपेक्षा होती, ती फोल ठरली आहे.
राजन साळवी यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी निवड झाल्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी निवडीचे स्वागत करत ठिकठिकाणी बॅनर लावले. आमदार उदय सामंत आणि योगेश कदम यांच्या समर्थनासाठी त्यांच्या मतदार संघात बॅनर लागले. २० जूनपासून राज्यात शिवसेनेच्या बंडखोर आमदारांमुळे शिवसेनेला एकामागून एक धक्के बसत आहेत. तोपर्यंत भाजप कार्यकर्ते प्रतिक्रिया देत नव्हते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीपर्यंत भाजपमध्ये आनंदी वातावरण होते. दुसरीकडे शिंदे गटासोबत असलेल्या बंडखोर आमदारांच्या कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शपथविधीनंतर जोरदार जल्लोष केला.
..
चौकट
सायलेंट मोड का आहे?
भाजपमध्ये केवळ सोशल मीडियावर पोस्ट टाकून आभासी आनंदोत्सव साजरा केला जात आहे. नव्या सरकारमध्ये जिल्ह्यातील ज्येष्ठ आमदार उदय सामंत आणि युवा आमदार योगेश कदम यांच्यापैकी कुणाला संधी मिळणार, याबाबत चर्चा सुरू झाली आहे; मात्र सध्या भाजप पदाधिकाऱ्यांचा हा सायलेंट मोड का आहे? याचेही उत्तर मिळालेले नाही.
...................
चौकट
भाजपचे पदाधिकारी संभ्रमात
सत्ता परिवर्तनात किंग ठरलेले देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन मंत्रिमंडळात सहभागी न होण्याचा घेतलेला निर्णय त्यानंतर पक्ष आदेशानुसार उपमुख्यमंत्री पदाची घेतलेली शपथ यामुळे अनेकांमध्ये नाराजीचा सूर दिसून आला. या निर्णयावर तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. यात खुद्द भाजपचे पदाधिकारी संभ्रमात आहेत
................
कोट
जिल्ह्यातील भाजप शांत नाही, ही वादळापूर्वीची शांतता आहे. आमचे संघटन व्यवस्थित सुरू आहे. नजीकच्या काळात जिल्ह्यात भाजप वाढलेली दिसेल.
- वसंत ताम्हणकर, भाजप तालुकाध्यक्ष, चिपळूण

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76626 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..