रत्नागिरी- रुग्णसेविका आशालता फडके यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- रुग्णसेविका आशालता फडके यांचे निधन
रत्नागिरी- रुग्णसेविका आशालता फडके यांचे निधन

रत्नागिरी- रुग्णसेविका आशालता फडके यांचे निधन

sakal_logo
By

rat१२p२७.jpg
L३५५४०
....
- आशालता फडके
...
आशालता फडके यांचे निधन

रत्नागिरी, ता. १२ ः गेली ३० वर्षे येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात रुग्णांना सर्वतोपरी मदत करणाऱ्या समाजसेविका आशालता वासुदेव फडके (वय ७८) यांचे आज दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. जिल्हा रुग्णालयात रुग्णांना डबा देणे, पेपर वाचून दाखवणे, नातेवाइकांशी संपर्क ठेवून गरजेची गोष्ट आणून देणे अशा विविध प्रकारची सेवा त्या विनामोबदला करत होत्या. सेवाव्रती म्हणून त्या रत्नागिरीकरांना सुपरिचित होत्या. त्यांच्या निधनाने अनेकांनी शोक व्यक्त केला.
आशाताई या शिरगाव येथील वृद्धाश्रमात गेली दोन वर्षे त्या वास्तव्यास होत्या. गेले पंधरा दिवस त्या आजारी होत्या. तीन वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचे निधन झाले. गृहिणी असलेल्या आशाताई रुग्णांना भेटण्याच्या वेळेत म्हणजे दुपारी ४ ते सायंकाळी ६ या वेळेमध्ये रुग्णसेवेसाठी जायच्या. सुमारे तीस वर्षे त्या रुग्णसेवा करत होत्या. प्रामुख्याने त्या रुग्णाला आवडणारा पदार्थ त्या घेऊन जायच्या. कित्येक रुग्ण काकूंची वाट बघत असायचे. काही वेळा रुग्णांसाठी नातेवाईक डबा द्यायला नसल्याने त्यांच्यासाठी पोळी-भाजीचे डबे घेऊन जायच्या कधी रुग्णांची पत्रं लिहून द्यायच्या, त्यांना वृत्तपत्र वाचून दाखवायच्या आणि लागणारी सर्व ती मदत त्या करायच्या. जिल्हा रुग्णालयात डॉक्टर, नर्स, वॉर्ड बॉय, सफाई कर्मचारी यांच्याशी त्यांची चांगली ओळख होती. त्यांच्या या कार्याबद्दल आशाताईंचा विविध संस्थांनी पुरस्कार देऊन गौरवही केला होता. सुरवातीच्या काळात रत्नागिरी शहरामध्ये विश्व हिंदू परिषदेमार्फत राम जन्मभूमी आंदोलन काळात गंगापूजन शिलापूजन कार्यक्रमात घरोघरी जाऊन पत्रक वाटणे, त्याचप्रमाणे संपूर्ण आंदोलनाची माहिती सांगणे, कॅलेंडर विक्री अशी कामे सहकारी महिलांसमवेत करत होत्या. आशाताईंच्या पश्चात तीन विवाहित मुली, जावई, नातवंडे, असा मोठा परिवार आहे. त्यामुळे आज आशाताईंच्या निधनाची बातमी कळताच परिचारिकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76638 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..