दुचाकी-टेम्पो अपघातात आंबोलीत युवक जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुचाकी-टेम्पो अपघातात आंबोलीत युवक जखमी
दुचाकी-टेम्पो अपघातात आंबोलीत युवक जखमी

दुचाकी-टेम्पो अपघातात आंबोलीत युवक जखमी

sakal_logo
By

दुचाकी-टेम्पो अपघातात
आंबोलीत युवक जखमी
आंबोली, ता. १२ ः येथे पर्यटनासाठी आलेल्या युवकांच्या दुचाकीला टेम्पोने धडक दिल्याने झालेल्या अपघातात युवक जखमी झाला. सतीश देसाई (वय २३, रा. उचगाव, शिनोळी) असे त्याचे नाव आहे. अपघाताची घटना सोमवारी (ता. ११) दुपारी घडली.
आंबोलीत सोमवारीदेखील पर्यटकांची मोठी गर्दी होती. कर्नाटक, बेळगाव, कोल्हापूरसह पश्‍चिम महाराष्ट्रातील पर्यटकांची संख्या जास्त होती. जखमी युवकास त्याच्या मित्रांनी येथील आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथून अधिक उपचारांसाठी १०८ रुग्णवाहिकेने सावंतवाडीत नेले. दरम्यान, आंबोलीत आज काही पर्यटकांनी हुल्लडबाजी केली. काही पर्यटक गाड्यांवर बसून, तर काही दुचाकीस्वार हुल्लडबाजी करत होते. रस्त्यावर दंगा करत होते. याचा नाहक त्रास इतर पर्यटकांना झाला. त्यामुळे येथे सुरक्षित पर्यटनासाठी पोलिसांनी पेट्रोलिंग करणे आवश्यक आहे, असे मत अनेकांनी व्यक्त केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76675 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..