शाळांचे व्यवस्थापन चालवायचे कसे? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शाळांचे व्यवस्थापन
चालवायचे कसे?
शाळांचे व्यवस्थापन चालवायचे कसे?

शाळांचे व्यवस्थापन चालवायचे कसे?

sakal_logo
By

L३५६७३

कुडाळ ः महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा कुडाळच्या पदाधिकाऱ्यांनी गटशिक्षणाधिकारी यांची भेट घेतली.

शाळांचे व्यवस्थापन
चालवायचे कसे?
प्राथमिक शिक्षक समिती ः समस्यांबाबत गटशिक्षणाधिकाऱ्यांशी चर्चा
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १३ ः अनुदान नसेल तर शाळांचे व्यवस्थापन चालवायचे कसे? असा सवाल प्राथमिक शिक्षक समिती कुडाळने गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर यांच्याशी चर्चा करताना उपस्थित केला.महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा कुडाळचे तालुकाध्यक्ष प्रसाद वारंग, सरचिटणीस महेश कुंभार यांनी पत्रकात म्हटले आहे की, राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या कुडाळ शाखेच्या शाळांना आवश्यक सोयीसुविधा, सादिल अनुदान, समग्र शिक्षा अनुदान, शैक्षणिक साहित्य व पाठ्यपुस्तके, वाहतूक भत्ता, आवश्यक स्टेशनरी, महत्वाचे शासन आदेश, शासकीय परिपत्रके प्रशासनाकडून उपलब्ध करुन दिली जात नसतील तर शाळा व्यवस्थापन चालवायचे कसे? असा प्रश्न करताच शिक्षकांच्या या भावना वरिष्ठ अधिकाऱ्यासमोर पोहचवू, असे किंजवडेकर यांनी सांगितले.

कुडाळ तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्या मागणीवरुन शिक्षक व शाळांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी प्रशासनाने चर्चेसाठी निमंत्रित केले होते. सध्या SERT मार्फत निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षण दिले जात आहे. हे प्रशिक्षण शाळेच्या वेळेतच दिले जाते. एकाचवेळी शाळेतील कामकाज व ऑनलाईन प्रशिक्षण कसे काय करायचे? असा शिक्षकांना प्रश्न पडला आहे. शालेय पोषण आहाराची दररोज ऑनलाईन एमडीएम अॅपवर भरली जाते तरीही परत त्याच्या हार्ड कॉपीज मागितल्या ज़ातात. ही कामे करायची केव्हा आणि अध्ययन करायचे केव्हा? या प्रश्नावर चर्चा करताना गटशिक्षणाधिकारी किंजवडेकर यांनी, ''शाळा व शिक्षकाच्या या समस्या आपण वरिष्ठ अधिकाऱ्याच्या निदर्शनास आणून देईन. चर्चा करताना राज्य उपाध्यक्ष राजन कोरगावकर, शिक्षक नेते नंदकुमार राणे, ज्येष्ठ शिक्षक मार्गदर्शक चंद्रकांत अणावकर, सुरेखा कदम, तालुकाध्यक्ष प्रसाद वारंग, सरचिटणीस महेश कुंभार, जिल्हा सरचिटणीस सचिन मदने, ज्येष्ठ पदाधिकारी दिनकर तळवणेकर, शिक्षक नेते शशांक आटक, एकनाथ सावंत, बाबाजी भोई आणि प्रशासनाच्यावतीने वरिष्ठ सहाय्यक कुणाल तेंडुलकर, समीर राऊळ उपस्थित होते. हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी तालुका शिक्षक समितीच्या कार्यकारीणी सभेत चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76811 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top