नानिवडेकरांनी ''गझल'' समृध्द केली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नानिवडेकरांनी ''गझल'' समृध्द केली
नानिवडेकरांनी ''गझल'' समृध्द केली

नानिवडेकरांनी ''गझल'' समृध्द केली

sakal_logo
By

L35674

तळेरे ः ''मधुस्मृती'' कार्यक्रमात गझलकार मधुसूदन नानिवडेकर यांना श्रध्दांजली अर्पण करताना मान्यवर.
(छायाचित्र ः एन. पावसकर)

नानिवडेकरांनी ''गझल'' समृध्द केली
प्रमोद जठार ः तळेरेत ''मधुस्मृती'' कार्यक्रमातून अभिवादन
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. १३ ः मधुसुदन नानिवडेकर यांच्यासारख्य़ा थोर प्रतिभावंत साहित्यिकाचा सहवास मला लाभला, हे मी माझे भाग्य समजतो. जीवनात चांगले मित्र आपल्याला उत्तुंग शिखरावर नेऊन ठेवतात, याचे उत्तम उदाहरण म्हणजे नानिवडेकर होते. आपल्या मनमिळाऊ स्वभावामुळे असंख्य माणसे जोडून त्यांचा सेतू बांधण्याचे काम केले. ''गझल'' या काव्यप्रकाराला एक नवीन आयाम देऊन ती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविली, असे भावपूर्ण उद्गार माजी आमदार प्रमोद जठार यांनी काढले.

ज्येष्ठ पत्रकार, लेखक, कवी, गझलकार मधुसुदन नानिवडेकर यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त येथील विजयालक्ष्मी दळवी महाविद्यालयामध्ये नानिवडेकरांच्या स्मृतींचा जागर करण्यात आला. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी ''मधुस्मृती'' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून श्री. जठार बोलत होते.
तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघ, विजयालक्ष्मी दळवी महाविद्यालय आणि प्रज्ञांगण परिवार, संवाद परिवार-तळेरे व श्रावणी कॉम्प्युटर तळेरे यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संवाद परिवाराचे संस्थापक डॉ. मिलिंद कुलकर्णी, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे माजी जिल्हाध्यक्ष पत्रकार गणेश जेठे, ज्येष्ठ कामगार नेते विद्याधर राणे, सेवानिवृत्त पोलिस अधिकारी सूर्यकांत तळेकर, तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाचे अध्यक्ष दत्तात्रय मारकड, वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अविनाश मांजरेकर, उपसरपंच दिनेश मुद्रस, प्रा. हेमंत महाडिक आदी उपस्थित होते. यावेळी श्री. जठार यांनी साहित्य चळवळीसाठी पंचवीस हजार रुपये मदत जाहीर करून नानिवडेकरांचा वारसा जोपासण्यासाठी साहित्य विषयक कार्यशाळा आयोजित करण्याचे आवाहन केले. परिचय निकेत पावसकर यांनी, स्वागत संजय खानविलकर यांनी, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणाली मांजरेकर यांनी केले. आभार दत्तात्रय मारकड यांनी मानले. कार्यक्रमासाठी सतीश मदभावे, प्रमोद कोयंडे, संजय खानविलकर, सौ. श्रावणी मदभावे, प्रा. हेमंत महाडीक आणि दळवी महाविद्यालयाचे सहकार्य लाभले. महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व साहित्यप्रेमी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76813 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..