गोरगरीबांना दर्जेदार सेवा देणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोरगरीबांना दर्जेदार सेवा देणार
गोरगरीबांना दर्जेदार सेवा देणार

गोरगरीबांना दर्जेदार सेवा देणार

sakal_logo
By

टिप ः जाहीरात बातमी
L३५६७८

कणकवली ः येथील आश्विनी हॉस्पिटलमध्ये नेत्रालय सुरू करण्यात आले आहे.

L३५६७९

कणकवली ः येथील लायन्स आय हॉस्पिटलचे उदघाटन डॉ. बी. एस. म्हाडेश्वर यांच्या हस्ते झाले. यावेळी सौ. म्हाडेश्वर, श्री. कदम, श्री. तांबे आदी उपस्थितीत होते.

गोरगरीबांना दर्जेदार सेवा देणार
डॉ. बी. एस. म्हाडेश्वर ः कणकवलीत नेत्रालय हॉस्पिटलचे उद्घघाटन
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. १३ ः ग्रामीण भागातील सर्वसामान्य गोरगरीब जनतेला कमी खर्चामध्ये चांगली आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे या उद्देशाने स्थानिकांनी एकत्रित येत कणकवलीत लायन्स आय हॉस्पिटल नेत्रालय सुरू केले आहे. येथे गोरगरीब जनतेला चांगली सेवा देणे हे असेच उद्दिष्ट असल्याचे मत डॉ. बी. एस. महाडेश्वर यांनी येथे व्यक्त केले.
शहरातील उपजिल्हा रुग्णालयाच्या बाजूला अश्विनी डायबेटिस केअर सेंटरमध्ये नव्याने लायन्स नेत्रालय सुरू करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील रुग्णांना डोळे तपासण्यासाठी किंवा डोळ्याच्या ऑपरेशनसाठी आता मिरज, कोल्हापूर, सांगली किंवा मुंबई, पुण्याकडे जाण्याची आवश्यकता नाही. कणकवली शहर आणि परिसरातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या तसेच वैद्यकीय क्षेत्रातून सेवानिवृत्त असलेल्या दहा लोकांनी एकत्रित एक मोठी गुंतवणूक केली आहे. लायन्स आय हॉस्पिटल येथे अद्यावत यंत्र साहित्य खरेदी करून लायन्स नेत्रालय सुरू केले आहे. या नेत्रालयाचे नुकतेच उद्घाटन डॉ. श्री. म्हाडेश्वर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

यावेळी डॉ. म्हाडेश्वर म्हणाले, "समाजाची सेवा करणे हे उद्दिष्ट पहिल्यापासूनच होते. माझ्या वैद्यकीय सरावाच्या वेळी अनेक समस्या येत होत्या. ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांना मधुमेहाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचबरोबर अनेक वृद्ध आणि गरीब रुग्ण डोळ्यांच्या आजाराचे असतात. अनेकांना शस्त्रक्रियेची गरज असते. परंतु, आर्थिक परिस्थिती नसल्याने गोरगरीब रुग्ण मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून घेत नाहीत. शस्त्रक्रिया करण्यासाठी गरीब रुग्णाकडे फारशी आर्थिक स्थिती नसते. त्यामुळे अनेक जण डोळ्याचे ऑपरेशन करत नाहीत. ही बाब लक्षात आल्यानंतर या परिसरात वैद्यकीय क्षेत्रात काम करून सेवानिवृत्त झालेल्या समाजसेवकांना एकत्रित करून आय नेत्रालय सुरू करण्याचा मानस व्यक्त केला. सुदैवाने प्रत्येकाला हा उपक्रम चांगला वाटला. समाजाची सेवा करत असताना खऱ्या अर्थाने कोणत्या गरजा आहेत. याकडे प्रत्येकाने लक्ष दिले. त्यामुळे नेत्रालय सुरू करावे अशी इच्छा प्रत्येकाने व्यक्त केली. या क्षेत्रात काम करणारी मंडळी यात स्वगुंतवणूक करून आपण गोरगरीब जनतेला चांगली सेवा देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आज येथे लायन्स आय हॉस्पिटल उभे राहिले आहे. या रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक साहित्य बसवण्यात आले आहे. येथे रुग्णांची डोळे तपासणी बरोबरच डोळ्याच्या विविध प्रकारचे शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. यासाठी या क्षेत्रातील तज्ञ मंडळी वेळोवेळी रुग्णालयाला भेट देणार आहेत. या रुग्णालयांमध्ये रुग्णांसाठी चांगल्या सुविधा उभ्या करण्यात आले आहेत. अगदी कमी खर्चामध्ये डोळ्याची शस्त्रक्रिया करण्याचा मानस आहे. कणकवली उपजिल्हा रुग्णालय अश्विनी हॉस्पिटलमध्ये येथे लायन्स नेत्रालय सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा."

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76816 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top