चिपळूण-लोंबकळणाऱ्या वीजवाहिन्या अखेर बदलल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण-लोंबकळणाऱ्या वीजवाहिन्या अखेर बदलल्या
चिपळूण-लोंबकळणाऱ्या वीजवाहिन्या अखेर बदलल्या

चिपळूण-लोंबकळणाऱ्या वीजवाहिन्या अखेर बदलल्या

sakal_logo
By

-rat13p17.jpg
35718
चिपळूण ः खेंड परिसरात बदलत असलेल्या धोकादायक वीजवाहिन्यांच्या कामाची पाहणी करताना शिवसेनेचे विभागप्रमुख अंकुश आवले.
--------------
लोंबकळणाऱ्या वीजवाहिन्या
बदलल्या; धोका टळला

खेंड परिसरातील नागरिक झाले होते भयभीत
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १३ ः शहरातील खेंड परिसरामध्ये स्वरविहार गृहसंकुलासमोरील रस्ता आणि श्री पिंपळ गणेशमंदिर ते श्री हनुमानमंदिर परिसरात महावितरण कंपनीच्या वीजवाहिन्या लोंबकळत होत्या. त्यामुळे अपघात घडून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याची तक्रार शिवसेना खेंड विभागप्रमुख अंकुश आवले यांनी कार्यकारी अभियंत्यांकडे केली होती. ‘महावितरण’च्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या भागातील धोकादायक बनलेल्या विद्युत वाहिन्या बदलल्या.
स्थानिक नागरिकांनी तक्रार केल्यानंतर आवले यांनी खेंड परिसरातील धोकादायक बनलेल्या विद्युत वाहिन्यांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली होती. त्यानंतर कार्यकारी अभियंता कैलास लवेकर यांच्याशी संपर्क साधून तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली होती. खेंड परिसरात दाट लोकवस्ती आहे. शिवाय अरुंद रस्त्यालगतच विद्युत खांब व त्यावर जुन्या विद्युतवाहिन्या आणि त्याही लोंबकळणाऱ्या स्थितीत असल्याने या रस्त्यावरून प्रवास करणारे वाहनधारक, विद्यार्थी, पादचारी आणि स्थानिक नागरिकांच्याही पोटात गोळा येत होता. हा गंभीर प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी गेले कित्येक दिवस अंकुश आवले पाठपुरावा करत होते. त्यांच्या मागणीची दखल घेऊन तेथील वीजवाहिन्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी बदलल्या. या वेळी कार्यकारी अभियंता कैलास लवेकर, उपअभियंता राहुल मदने, प्रधान तंत्रज्ञ अनंत सावर्डेकर, कर्मचारी शितप व त्यांचे सहकारी, अंकुश आवले, राजू कोळेकर, अनिल हटकर, विनोद वलावटे, अनंत डाफळे आदी उपस्थित होते. या कर्मचाऱ्यांना स्थानिक रहिवाशांनी सहकार्य केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76836 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..