राजापूर-सायबाचे धरणक्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र घोषित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर-सायबाचे धरणक्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र घोषित
राजापूर-सायबाचे धरणक्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र घोषित

राजापूर-सायबाचे धरणक्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र घोषित

sakal_logo
By

-rat13p18.jpg
35719
राजापूर ः कोदवली येथील सायबाचे धरण.
-----------------
सायबाचे धरण परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित

राजापूर पालिका; पाणी प्रदूषण करणाऱ्यांवर करणार कारवाई
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १३ ः राजापूर शहराच्या पाणीपुरवठ्याचा मुख्य जलस्त्रोत असलेल्या कोदवली येथील सायबाच्या धरणाच्या ठिकाणची जलव्यवस्था स्त्रोत प्रदूषित झाल्यास त्यातून शहरामध्ये विविध रोग वा साथींचा प्रार्दुभाव वा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे येथील स्त्रोताला नगर पालिकेने प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले असून, येथील जलस्त्रोत दूषित करण्यासह त्याला हानिकारक ठरणारे कृत्य करणाऱ्‍यांच्या विरोधात पालिकेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. हे कृत्य करणाऱ्‍यांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा नगर पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांनी दिला आहे.
ब्रिटिशांच्या काळामध्ये बांधकाम झालेले कोदवली येथील सायबाचे धरण गेल्या सुमारे १४० वर्षाहून अधिक काळ शहराला पाणीपुरवठा करत आहे. या ठिकाणाहून पाणीपुरवठा होण्यामध्ये अन्य जलस्त्रोतांच्या तुलनेमध्ये फारसा खर्च होत नसल्याने येथील पाणीपुरवठ्याला विशेष महत्व आहे; मात्र, लोकांच्या चुकीच्या वर्तणुकीमुळे हा जलस्त्रोत दूषित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिकेने हा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या जलव्यवस्था स्त्रोतास हानिकारक ठरतील, अशी कृत्य करण्यास सक्त मनाई केली असून अशी कृत्य करणाऱ्‍यांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा मुख्याधिकारी भोसले यांनी दिला आहे.
----------
चौकट ः
या कारणांसाठी होणार कारवाई
* जलव्यवस्था केंद्रातील पाणी दूषित किंवा खराब करणे.
* कोणतेही जनावर शिरू देणे, स्नान करणे
* कोणतीही वस्तू किंवा पदार्थ टाकणे
* कोणतेही जनावर किंवा वस्तू धुणे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76837 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top