चिपळूण ः पाऊस आणि वाहतूककोंडीने नागरिक त्रस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः पाऊस आणि वाहतूककोंडीने नागरिक त्रस्त
चिपळूण ः पाऊस आणि वाहतूककोंडीने नागरिक त्रस्त

चिपळूण ः पाऊस आणि वाहतूककोंडीने नागरिक त्रस्त

sakal_logo
By

rat13p19.jpg
L35705
ः चिपळूण ः मुसळधार पावसामुळे चिपळुणात सखल भागात पाणी भरले आहे.
----------
-rat13p25.jpg
35735
ः चिपळूण ः रस्त्यावर पडलेले प्रचंड खड्ड्यांमुळे वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे.
---------------
रस्ते खड्ड्यांत, चालक वाहतूक कोंडीत..!

चिपळुणात नागरिक त्रस्त; मुसळधार पावसाने रस्त्याची दुर्दशा
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १३ ः शहरातील अनेक भागांत आज वाहतूक कोंडी झाली होती. मुंबई-गोवा महामार्गावरील रस्त्यावर खड्ड्यांत पाणी साचल्याने सर्व वाहनचालक अंदाज घेत वाहन चालवत होते. परिणामी वाहतुकीचा वेग मंद होता. चिपळूण शहरात सकाळी साडेआठ ते दुपारी साडेबारापर्यंत वाहतूक कोंडी कायम होती.
शहरातील चिंचनाका, मार्कंडी, बाजारपेठ, पद्मा चित्रमंदिर परिसर, गांधीचौक या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. अखंड पडणारा पाऊस आणि वाहतूक कोंडी अशा अडथळ्यांचा सामना करावा लागल्याने वाहन चालवणे त्रासदायक ठरत होते. शहरात आज संततधार सुरू होती. त्यामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले. शहरातून जाणारा संपूर्ण महामार्ग खड्डेमय आहे. त्यात खड्ड्यात पाणी साचल्याने वाहन चालवताना कसरतच करावी लागत होती. त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला होता. बहादूर शेखनाका, गुरुकूल कॉलेज परिसर, डीबीजे कॉलेज ते साईमंदिर, शिवाजीनगर बसस्थानक या परिसरात चारचाकी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. बहादूर शेखनाकाहून कापसाळकडे जाण्यासाठी या परिसरातील रस्ता अरुंद आहे. त्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनांचा वेग मंदावला होता. महामार्गावर काही ठिकाणी पाणी साचले होते. या पाण्यातून वाहन चालवावे लागत होते. वाहनचालकांची पावसात वाहन चालवताना त्रेधातिरपीट उडाली.
-----------
चौकट
महामार्ग विभागाचा अजब कारभार
भरपावसात चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या कंपनीचे कर्मचारी मातीचा मुरुम टाकून खड्डे बुजवण्याचा अजब प्रकार करत होते. खड्डा मुरुमाने भरला की, माती परत पाण्याने वाहून जात होती. खड्डे पुन्हा तसेच राहात होते. काही ठिकाणी खडी टाकून खड्डे बुजवण्याचा प्रयत्न सुरू होता.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76853 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..