राजापूर-विद्यार्थ्यांनी घेतला भातलावणीचा अनुभव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर-विद्यार्थ्यांनी घेतला भातलावणीचा अनुभव
राजापूर-विद्यार्थ्यांनी घेतला भातलावणीचा अनुभव

राजापूर-विद्यार्थ्यांनी घेतला भातलावणीचा अनुभव

sakal_logo
By

-rat13p27.jpg
L35748
ः राजापूर ःभातलावणी करताना विद्यार्थी.
,.....
-rat13p28.jpg
L35749
ः नांगरणी करताना शिक्षक आणि लावणी करताना विद्यार्थी.
-------------
काही सुखद ...............लोगो
....
विद्यार्थ्यांनी केली भातलावणी; श्रममूल्याची ओळखही झाली

चिखलगाव जिल्हा परिषद शाळेचे शिक्षकही शेतात; शेतकऱ्‍यांच्या श्रमामूल्याची जाणीव
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १३ ः शेतीमधून मिळणारे कमी उत्पन्न असो वा अन्य कारणांमुळे शेतीचे क्षेत्र दिवसागणिक घटत असताना शेतीविषयी मुलांमध्ये आवड निर्माण व्हावी आणि शेतीक्षेत्राचे महत्व विद्यार्थ्यांना समजावे या उद्देशाने तालुक्यातील चिखलगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी भातलावणीची अनुभूती घेतली. या उपक्रमामध्ये शेतकऱ्ं‍याच्या श्रमाचे मूल्य अनुभवले.
पुस्तकासह आजूबाजूला दिसत असलेली शेती नेमकी कशी केली जाते, शेतकर्‍यांच्या श्रमाचे नेमके मुल्य कसे आहे, याची अनुभूती विद्यार्थ्यांना शालेय जीवनामध्ये व्हावी या उद्देशाने तालुक्यातील चिखलगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी शेतामध्ये शेतकर्‍यांसोबत काही तास व्यतीत केले. यामध्ये प्रत्यक्ष शेतीच्या कामांमध्ये सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी नांगरणीसह जमिनीची मशागत करणे, भातलावणी करणे आदी विविध प्रकारची मशागतींची कामेही विद्यार्थ्यांनी केली.
शिक्षकांनीही शेतीची कामे करताना शेतीच्या कामांचा प्रॅक्टिकल अनुभव घेतला. प्रशाळेचे मुख्याध्यापक विजय खांडेकर यांनी ट्रॅक्टर स्वतः चालवून शेत नांगरणीचे तर पदवीधर शिक्षक समीर देशपांडे यांनी पारंपरिक पद्धतीने बैलजोडीच्या साहाय्याने होत असलेली नांगरणी केली. शिक्षिका अहिल्या बंडगर यांनी विद्यार्थ्यांसमवेत भातलावणी करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. गावच्या सरपंच अंजली जड्यार, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक आणि शेतकरी उपस्थित होते. चिखलगाव येथील शिक्षकांनी राबवलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे युवावर्ग शेतीकडे पुन्हा एकदा आकर्षित होण्याला एकप्रकारे मदत होणार आहे. चिखलगाव शाळेने भातलावणीच्या उपक्रमाचे पंचक्रोशीतून कौतुक केले जात आहे.

चौकट ः
चारसूत्री लागवडीचे महत्व विषद
कृषी विभागातील कृषी पर्यवेक्षक शिंदे आणि तांदळे यांनी विद्यार्थ्यांसह शेतकर्‍यांना चारसुत्री भातलागवडीचे प्रात्यक्षिक करून दाखवले. या वेळी त्यांनी चारसूत्री लागवडीचे महत्वही विषद केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76863 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top