फोटोसंक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फोटोसंक्षिप्त
फोटोसंक्षिप्त

फोटोसंक्षिप्त

sakal_logo
By

L३५७५५

मालवण ः महेश वरक यांना नियुक्ती पत्र देताना माजी खासदार नीलेश राणे.

कुडाळ-मालवण विधानसभा
संपर्कप्रमुखपदी महेश वरक
मालवणः भाजप भटके-विमुक्त आघाडी माजी तालुकाध्यक्ष महेश वरक यांना कुडाळ-मालवण विधानसभा संपर्कप्रमुख पदी नियुक्ती देण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्ती पत्र माजी खासदार नीलेश राणे यांच्या हस्ते भाजप भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले.
भाजप भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली आमदार नीतेश राणे व जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष काळे यांनी निवड जाहीर केली. यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, जिल्हा बँक संचालक बाबा परब, भाजप भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा अध्यक्ष किरण चव्हाण, भाजप भटके विमुक्ता आघाडी जिल्हा उपाध्यक्ष संदीप होळकर, भाजपचे दीपक पाटकर, सुदेश आचरेकर, भाजप भटके विमुक्त आघाडी मालवण तालुकाध्यक्ष बाळा गोसावी, सिंधुदुर्ग जिल्हा संघटन मंत्री सुनील खरात, भाजप भटके विमुक्त आघाडीचे जिल्हा युवाध्यक्ष महेश जंगले व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
...................
L३५७५६

कुंब्रल ः धनगरवाडी येथील टॉवरजवळ रस्त्यात खोदलेला धोकादायक चर.

तळकट-दोडामार्ग रस्ता
वाहतुकीस धोकादायक
साटेली भेडशीः कुंब्रल परिसरातील ग्रामस्थांनी तळकट-दोडामार्ग रस्त्यात पाण्याची पाईपलाईन नेण्यासाठी खोदलेले चर वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहेत. पावसामुळे ते चर खोल झाल्याने त्यांचा अंदाज न आलेल्या वाहनचालकांचे अपघातही घडत आहेत. याप्रकरणी कुंब्रल सरपंच प्रवीण परब आणि जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.
बांदा, तळकट, कुंब्रल भरपालमार्गे दोडामार्गला जाणाऱ्या रस्त्यात स्थानिक ग्रामस्थांनी आपापल्या घरात नळजोडणी घेण्यासाठी म्हणून अनेक ठिकाणी चर मारले आहेत. चर मारल्यानंतर ते खडी व सिमेंट टाकून बुजविणे आवश्यक होते; पण संबंधित ग्रामस्थ, ग्रामपंचायत आणि बांधकामच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे ते चर धोकादायक बनले आहेत. त्यातून वाहने हाकणे धोकादायक झाले आहे. त्याकडे संबंधितांनी लक्ष देऊन रस्ता खोदणाऱ्यांवर कारवाई करावी. तसेच रस्ता वाहतुकीस योग्य बनवावा, अशी मागणी होत आहे.
.......................

L३५७५७
ओळ - दोडामार्ग ः महावितरणला निवेदन देताना नगराध्यक्ष चेतन चव्हाण व अन्य.

कसई दोडामार्गसाठी स्वतंत्र
सबस्टेशन उभारण्याची मागणी
दोडामार्ग ः कसई दोडामार्गसाठी स्वतंत्र ३३/११ केव्ही सबस्टेशन उभारण्यात यावे. तसेच येथील नगरपंचायत हद्दीतील कार्यालये व ग्राहकांसाठी महालक्ष्मी विद्युत कंपनीकडून स्वतंत्र ११ केव्ही लाईन जोडून वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी महावितरणकडे केली आहे.
त्यांनी आपल्या मागणीचे निवेदन सहायक अभियंता श्री. आपटेकर यांच्याकडे दिले. यावेळी त्यांच्यासोबत नगरसेवक नितीन मणेरीकर, माजी नगरसेवक सुधीर पनवेलकर व संतोष म्हावळणकर, सुधीर चांदेलकर आदी उपस्थित होते. सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याने शासकीय कार्यालये व अन्य ठिकाणी तालुक्यातून कामाला येणाऱ्या ग्रामस्थांची गैरसोय होते. शिवाय व्यापारी वर्गाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. त्याचा विचार करून महावितरणने कसई दोडामार्गसाठी स्वतंत्र ३३/११ केव्ही सबस्टेशन उभारावे. तसेच कसई-दोडामार्ग नगरपंचायत हद्दीतील वीजपुरवठा अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी महालक्ष्मी विद्युत कंपनीकडून स्वतंत्र ११ केव्ही लाईन जोडून वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी केली आहे.
.......................

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76874 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top