पावस-नागरिकांनी विविध लघुद्योग करण्याची गरज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावस-नागरिकांनी विविध लघुद्योग करण्याची गरज
पावस-नागरिकांनी विविध लघुद्योग करण्याची गरज

पावस-नागरिकांनी विविध लघुद्योग करण्याची गरज

sakal_logo
By

rat13p26.jpg
35747
पावस ः खादी ग्रामोद्योगचे प्रभारी जिल्हाधिकारी शैलेश कोलथरकर यांचा सत्कार करताना रवींद्र भोवड.
-------------
विविध लघुउद्योग उभारून प्रगती साधावी

गोळपमधील मार्गदर्शन मेळाव्यात रवींद्र भोवड यांचे मत
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. १४ ः स्वयंरोजगार आणि लघुउद्योगातून रोजगारनिर्मिती करण्यासाठी सरकारी योजनांचे पाठबळ घेऊन आपल्या भागात विविध उद्योगांचे जाळे उभे करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते रवींद्र भोवड यांनी व्यक्त केले.
अनुलोम प्रेरित जनसेवा सामाजिक मंडळाच्या वतीने गोळप येथे उद्योग मार्गदर्शन मेळावा झाला. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य अॅड. अविनाश काळे यांनी मंडळाच्यावतीने विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. सध्या अनेकजणांना उद्योग करावयाचा असतो; पण योग्य मार्गदर्शन मिळत नाही, योजनांची माहिती नसते. त्यामुळे व्यवसाय करण्यात खूप अडचणी निर्माण होतात, हे लक्षात आल्याने या अडचणी दूर करण्यासाठी उद्योग मार्गदर्शन मेळावा घेण्यात आला. भविष्यात खादी ग्रामोद्योग आणि जिल्हा उद्योग केंद्र माध्यमातून छोटे छोटे उद्योग उभारण्यास आवश्यक सहकार्य मंडळाकडून केले जाईल.
मेळाव्यात पंतप्रधान रोजगार निमिर्ती योजना व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना तसेच विशेष घटक योजना यांची माहिती खादी ग्रामोद्योगचे औद्योगिक पर्यवेक्षक संदीप माने यांनी दिली. त्यांनी योजनेचे अर्ज ऑनलाइन केल्यानंतर त्याची निवडप्रकिया, बँककर्ज, योजनेचे मिळणारे अनुदान पद्धत याबाबत माहिती दिली. खादी ग्रामोद्योगचे प्रभारी जिल्हाधिकारी शैलेश कोलथरकर यांनी मधाचे गाव ही योजना समजावून सांगितली व मधपाळ योजनेचा लाभ लोकांनी घ्यावा, असे आवाहन केले. ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी मार्गदर्शन केले. या वेळी समित घुडे, प्रकाश संते, महेश पालकर, मानसी बापट, हरीश राडये, उदय राडये, विनोद जोशी आदी उपस्थित होत्या.
-------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76902 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..