रत्नागिरी ः खासदारांनी सोडले संपर्क कार्यालय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः खासदारांनी सोडले संपर्क कार्यालय
रत्नागिरी ः खासदारांनी सोडले संपर्क कार्यालय

रत्नागिरी ः खासदारांनी सोडले संपर्क कार्यालय

sakal_logo
By

फोटो येत आहे
...
rat13p31.jpg
35796
-रत्नागिरी- खासदार विनायक राऊत यांनी अंतर्गत वादातून मारूंती मंदिर येथील संपर्क कार्यालय स्वतःहून सोडले.
-----------
खासदारांनी राऊतांनी सोडले संपर्क कार्यालय

सामंतांकडून साळवींकडे; बोचऱ्या टीकेनंतर दुखावल्याची जाणीव
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ ः खासदार विनायक राऊत यांनी सेनेच्या मेळाव्यात आमदार सामंत यांच्यावर उपरा आणि गद्दार अशी बोचरी टीका केली. त्यामुळे सामंत दुखावले असल्याची पूर्ण जाणीव राऊत यांना झाल्यामुळे सामंतांनी भेट म्हणून दिलेले मारूती मंदिर येथील संपर्क कार्यालय खासदार राऊत यांनी स्वतःहून सोडले आहे. आठवडा बाजार येथील आमदार राजन साळवींच्या कार्यालयात खासदारांचे संपर्क कार्यालय स्थलांतरित केले आहे. अंतर्गत वाद वरवर संयमी वाटत असला तरी पुढील लोकसभा निवडणुकीला त्याचे गंभीर परिणाम दिसणार यात शंकाच नाही.
आमदार उदय सामंत शिवसेनेत दाखल झाल्यानंतर सेना आणखी भक्कम झाली. त्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांना रत्नागिरी विधानसभा मतदार संघाने मोठे मताधिक्य दिले. आमदार उदय सामंत, उद्योजक किरण सामंत आणि त्यांच्या स्वतंत्र राबणाऱ्या टीममुळे हे शक्य झाले. खासदारांना मताधिक्य देण्यामध्ये सामंतांचा सिंहाचा वाटा होता. या निवडणुकीनंतर खासदार विनायक राऊत आणि सांमत यांचे संबंध अधिक मजबूत आणि घरोब्याचे झाले. निवडणूक झाल्यानंतर सुमारे दीड वर्षानंतर अंतर्गत चढाओढी आणि कुरघोड्यांमुळे फारकत पडली. यातून चांगलीच धुसफूस सुरू झाली; मात्र आजपर्यंत त्याची जाहीर वाच्यता झाली नव्हती. खासदार दौऱ्यावर यायचे तेव्हा रत्नागिरी विधानसभा मतदार संघाचा दौरा टाळायचे.
बंडानंतरही रत्नागिरीतही गेल्या रविवाही निष्ठावंतांचा निर्धार मेळावा झाला. या वेळी खासदार विनायक राऊत यांनी सामंत यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांना ''उपरा'', गद्दार, असे संबोधले. त्यांनी जाहीर सांगितले की, मला रत्नागिरी मतदारसंघात येण्यास विरोध केला जात होता. सामंत यांनी ''उपरा'', गद्दार या टीकेला फार संयमाने उत्तर दिले. लवकरच आपण राऊत यांचा गैरसमज दूर करू, असे त्यांनी सांगितले होते; मात्र हा इशाराच होता.
...
चौकट
भैय्या सामंत यांची ती भेट
मारुती मंदिर येथील खासदारांचे संपर्क कार्यालय हे सामंतांचे बंधू भैय्या सामंत यांची भेट होती. टीका सामंतांना जिव्हारी लागल्याची जाणीव झाल्यानंतर खासदारांनी स्वतःहून हे संपर्क कार्यालय सोडण्याचा निर्णय घेतला. सेनेचे उपनेते राजन साळवी यांच्या आठवडा बाजार येथील कार्यालयात खासदारांचे कार्यालय लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76908 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top